Sunday, October 6, 2024
Homeनाशिकमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुसळधार पावसाने रेल्वे ट्रॅकवर वाळू व माती साचली; रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर काम सुरु

- Advertisement -

इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

मुंबईसह कल्याण ते कसारा परिसरात तुफान पाऊस सुरू असल्याने रविवारी याचा मध्य रेल्वेवर या पावसाचा मोठा परिणाम दिसुन आला. मुसळधार पावसामुळे उंबरमाळी येथील रेल्वे लाईनवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तर वाशिंद जवळ ट्रॅकवर वाळू माती जमा झाली होती. त्यामुळे मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी व मुंबईहून नाशिककडे येणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. यामुळे पंचवटी एक्सप्रेस इगतपुरी येथे रद्द करण्यात आली.


अनेक रेल्वे गाड्या विविध स्थानकांवर थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे काही प्रवाशांनी मुंबई व नाशिकला जाण्यासाठी खाजगी वाहनांचा आधार घेतला होता. रेल्वे ट्रॅकवरील वाळु व माती काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सुरु होते.

इगतपुरी रेल्वे स्थानकातून डाऊन मार्गाची गोरखपूर एक्स्प्रेस ही पहिली गाडी नाशिकरोडच्या दिशेने रवाना झाली होती. तसेच उत्तर भारतातून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या मनमाड, नाशिकरोड, देवळाली, इगतपुरी आदी रेल्वे स्थानकांवर थांबवण्यात आल्या होत्या. सकाळच्या सुमारास रेल्वे वाहतुक विस्कळीत झाल्याने प्रवाशी व चाकरमान्यांचे मोठे हाल झाले आहेत.

मुंबई व शहापुर परिसरात शनिवारी रात्रीपासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी पहाटे आटगाव रेल्वे स्थानकाच्या पुढे रेल्वे ट्रॅकवर अचानक झाड पडले. यामुळे मुंबईहुन कसारा येथे जाणारी वाहतूक तीन तासाहून अधिक काळ ठप्प होती. सकाळी ८ वाजेच्या सुमारास रेल्वे ट्रॅकवरील झाड काढण्यात आले. त्यानंतर कसाराकडे जाणारी वाहतूक सुरू झाली. ट्रॅकवरील झाड काढल्यानंतर लोकल सेवा व मागे अडकलेल्या मेल एक्सप्रेस गाड्या कसाराकडे सोडण्यात आल्या.

मात्र तीन तासाने सुरु झालेली रेल्वे सेवा लगेचच अवघ्या १५ मिनिटांनी पुन्हा बंद झाली. मात्र ट्रॅकवरील झाड काढल्यानंतर लोकल सेवा व मागे अडकलेल्या मेल एक्सप्रेस गाड्या कसाराकडे सोडण्यात आल्या. तीन तासाने सुरु झालेली रेल्वे सेवा लगेचच अवघ्या १५ मिनिटांनी पुन्हा बंद झाली.

वासिंद रेल्वे स्थानकाजवळ वाहत्या पाण्यामुळे ओव्हर हेड वायरचा पोल खचल्याने रेल्वेला होणारा वीज पुरवठा बंद झाला. परिणामी वासिंदहून कसाराकडे जाणारी व कसाराहून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली. रेल्वेची वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद झाल्याची उद्घोषणा रेल्वेकडून करण्यात आली होती. दरम्यान, यामुळे टिटवाळा ते कसारा रेल्वे स्थानका दरम्यान दोन्ही मार्गिकेवर मेल एक्सप्रेस, लोकल गाड्या अडकून पडल्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला होता. या सर्व घटनेमुळे अनेक रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या