Monday, September 16, 2024
Homeमनोरंजनगृहमंत्रालयाकडून कंगनाला Y श्रेणीची सुरक्षा

गृहमंत्रालयाकडून कंगनाला Y श्रेणीची सुरक्षा

नवी दिल्ली

- Advertisement -

शिवसेना व शिवसेना नेते संजय राऊत यांच्यांशी सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री कंगना रणौत हिला Y श्रेणीची सुविधा देण्यात आली आहे.

कंगनानं ट्वीट करत ‘९ सप्टेंबर रोजी मुंबईत येते आहे, कुणाच्या बापात हिंमत असेल रोखून दाखवा, असे थेट आव्हान शिवसेनाला दिले होते. कंगनाच्या या टि्वटनंतर नव्या वादाला सुरु झाला. एवढे बोलून कंगना थांबली नाही तर ‘महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही, मी मराठा आहे, काय उखडायचे ते उखडा’, असेही आव्हन कंगनाला दिले. यानंतर मात्र शिवसैनिकांनीही कंगनाविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. यामुळे कंगनाला गृहमंत्रालयाने वाय श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिच्या सुरक्षेसाठी ११ पोलिस कर्मचारी असणार आहे. कंगना ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या