Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशकेंद्र-राज्याने एकजुटीने काम करणे गरजेचे : पंतप्रधान मोदी

केंद्र-राज्याने एकजुटीने काम करणे गरजेचे : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली –

देशाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्ये यांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

- Advertisement -

म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नीती आयोगाची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

आत्मनिर्भर भारतासाठी खासगी क्षेत्रांना साथ देण्याचे आवाहन यावेळी मोदींनी केले. आर्थिक प्रगतीसाठी सरकारला खासगी क्षेत्राचा आदर करावा लागेल आणि त्यास योग्य प्रतिनिधित्वदेखील द्यावं लागेल तसेच देशाच्या उभारणीत प्रत्येकाला हातभार लावण्याची संधी मिळावी हे आपल्या सरकारचं धोरण असल्याचेही मोदी म्हणाले.

या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, हरयाणाचे मुख्यमंत्री एम.एल. खट्टर, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या