Saturday, May 17, 2025
Homeक्राईममहिलेचे सोन्याचे गंठण हिसकावले

महिलेचे सोन्याचे गंठण हिसकावले

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

शहरातील बुरूडगाव रस्त्यावरील स्क्रायब्रीज सोसायटीच्या गेटजवळ उभ्या असणार्‍या महिलेच्या गळ्यातील दुचाकीवर आलेल्या दोघांनी पाच तोळ्याचे 82 हजार 500 रुपये किमतीचे गंठण हिसकावले. ही घटना मंगळवारी (दि.7) रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी शुक्रवारी (दि.10) कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. जयश्री अमृतलाल कोठारी (वय 63, रा. स्क्रायब्रीज सोसायटी, बुरूडगाव रोड, नगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. जयश्री कोठारी मंगळवारी सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी साईनगरच्या कोपर्‍यापर्यंत फिरून पुन्हा माघारी परतल्या.

सोसायटीच्या गेटवर नणंद सुरेखा देसरडा भेटल्या. त्या दोघी गप्पा मारत असताना पाठीमागून काळ्या रंगाच्या दुचाकीवर दोघेजण आले. काही समजण्याअगोदरच दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्ती जयश्री कोठारी यांच्या गळ्यातील पाच तोळ्याचे सोन्याचे गठंण हिसकावले. त्यांना धक्का देऊन खाली पडले. त्यांनी आरडाओरडा केला. मात्र चोर दुचाकीवर सुसाट निघून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दोन चोरांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नीरज चोप्राने ९०.२३ मीटर भाला फेकत केली नव्या विक्रमाची नोंद

0
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने दोहा डायमंड लीग स्पर्धेत नव्या विक्रमाची नोंद केली आहे. दोहा डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्राने तिसऱ्या प्रयत्नात ९०. २३ मीटर लांब...