Wednesday, February 4, 2026
Homeनगरवृध्द महिलेच्या गळ्यातील चार तोळ्यांचे मंगळसूत्र ओरबाडले

वृध्द महिलेच्या गळ्यातील चार तोळ्यांचे मंगळसूत्र ओरबाडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कॉलनीमध्ये फेरफटका मारत असलेल्या वृध्द महिलेच्या गळ्यातील चार तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरील दोघांनी ओरबाडून नेले. सावेडी उपनगरातील नवलेनगर परिसरात शनिवारी (14 सप्टेंबर) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्यांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदा मधुकर रोहकले (वय 63 रा. बीएसएनएल टेलीफोन ऑफिस समोर, नवलेनगर, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्या बीएसएनएल ऑफिसमधून सन 2020 मध्ये सेवानिवृत्त झाल्या आहेत.

- Advertisement -

त्या शनिवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास घरासमोर कॉलनीमध्ये फेरफटका मारत होत्या. त्याचवेळी दुचाकीवरून दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या जवळून गेले व पुढे थोड्या अंतरावर जाऊन पुन्हा मागे वळून फिर्यादी जवळ आले. फिर्यादीला काही कळायच्या आत दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील चार तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडले व दोघे दुचाकीवरून गजानन महाराज मंदिराच्या दिशेने पसार झाले. फिर्यादीने आरडाओरडा केला असता घटनास्थळी गर्दी जमा झाली. तोफखाना पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. रोहकले यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

YouTube video player

सावेडी उपनगरात मोठ्या प्रमाणात सोनसाखळी चोरीच्या घटना घडत आहेत. काही ठरावीक टोळ्या महिलांचे दागिने लंपास करत आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना यश येत नाही. नवलेनगर येथे शनिवारी सायंकाळी घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनामधील संशयितांनी तोंडाला मास्क बांधलेले असल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी नाकाबंदी करून अशा चोरट्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्या

Rahuri : नदीपात्रात पाय घसरून पडल्याने इसमाचा मृत्यू

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील प्रवरा नदीपात्रात पाय घसरून पडल्याने एका 40 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दत्तात्रय गोकुळ निकम...