Wednesday, June 26, 2024
Homeनगरदोन वेगवेगळ्या घटनांत सव्वा पाच तोळ्यांचे दागिने लांबविले

दोन वेगवेगळ्या घटनांत सव्वा पाच तोळ्यांचे दागिने लांबविले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

मैत्रिणीसोबत दुचाकीवरून घरी जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी इसमापैकी एकाने महिलेच्या गळ्यातील 18 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र व 17 ग्रॅम वजनाचे मिनीगंठण असे साडे तीन तोळ्यांचे दानिगे बळजबरीने हिसकावून चोरून नेले. ही घटना पाईपलाईन रस्त्यावरील पद्मावती टी पॉईंटजवळ घडली. याप्रकरणी सरिता शैलेश भोलाणे (वय 40, रा. भिस्तबाग चौक, पाईपलाईन रस्ता) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी भोलाणे व त्यांची मैत्रिण माधुरी धनंदर (रा. किसनगिरीनगर, पाईपलाईन रस्ता) अशा दोघी दुचाकीवरून नगर- मनमाड रस्त्याने घराकडे जात असताना पद्मावती टी पॉईंटजवळ पाईपलाईन रस्त्याकडे वळण घेत असताना पाठीमागून दुचाकीवर दोन अनोळखी इसम आले. त्यापैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने भोलाणे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व मिनीगंठण हिसकावून चोरून नेले. त्यानंतर दुचाकीवरील त्या अनोळखी व्यक्तींनी तेथून पोबारा केला. पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

दुसरी घटना श्रमिक बालाजी मंदीर, श्रमिकनगर, सावेडी येथे शनिवारी (दि. 26) दुपारी अडीच वाजता घडली. मंदिरातील गर्दीचा फायदा घेत चोरट्याने शिला हिरालाल मुदीगंटी (वय 60 रा. नित्यसेवा, पाईपलाईन रस्ता) यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किंमतीची पावणे दोन तोळ्याची सोन्याची चेन लंपास केली. याप्रकरणी मुदीगंटी यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सावेडीत वाढत्या चोरीच्या घटना पाहता चोरट्यांनी तोफखाना पोलिसांना आवाहन दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या