Wednesday, October 30, 2024
Homeनगरदेवदर्शनासाठी गेलेल्या दोन महिलांचे सोन्यांचे दागिने लांबविले

देवदर्शनासाठी गेलेल्या दोन महिलांचे सोन्यांचे दागिने लांबविले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

देवदर्शनासाठी गेलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्यांचे दागिने धूमस्टाईलने लांबविल्याची घटना नगर-मनमाड रोड व न्यू आर्टस् महाविद्यालया समोर घडली.

- Advertisement -

बुर्‍हाणनगर देवीचे दर्शन करुन घराकडे चाललेल्या महिलेची सोन्याची चेन व पेंडल बळजबरीने तोडून चोरुन नेले. ही घटना नगर-मनमाड रस्त्यावर हॉटेल मेघनंद जवळ 20 रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐश्वर्या कांबळे (रा. निंबळक) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्या बर्‍हाणनगर देवीचे दर्शन घेऊन घरी जात असताना मनमाड रस्त्यावर हॉटेल मेघनंदजवळ पाठिमागून आलेल्या काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरील अनोळखी इसमाने त्यांच्या गळ्यातील सव्वा तोळा वजनाची सोन्यांची चेन व पेंडल तोडून भरधाव वेगाने पलायन केले.

पुढील तपास तोफखाना पोलिस करीत आहे. दुसरी घटना न्यू आर्टस् महाविद्यालयासमोर घडली. फिर्यादी शोभा नितीन रासने (रा. रासने नगर) या त्यांच्या पतीसह मोटारसायकलवरुन शहाजी रोडवरील कालिका देवीच्या दर्शनासाठी चालल्या होत्या. न्यू आर्टस् कॉलेजसमोरुन दिल्लीगेटकडे जात असताना भरधाव वेगात आलेल्या मोटारसायकलवरील अनोळखी इसमाने फिर्यादीच्या गळ्यातील 50 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून पलायन केले. याप्रकरणी तोफखना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या