Friday, May 3, 2024
Homeनाशिकदेवळालीत चैन स्नॅचिंग, तीन तासात संशयित जेरबंद

देवळालीत चैन स्नॅचिंग, तीन तासात संशयित जेरबंद

देवळाली कॅम्प | Deolali Camp

शहरासह परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटनांत वाढ होत आहे. देवळाली गावातील विजय नगर परिसरात पाच वाजेच्या सुमारास…

- Advertisement -

भाजीपाला घेत असलेल्या महिलेच्या गळयातील सुमारे ३५ हजार रुपये किमितेचे सोन्याची पोत मोटार साईकल वरून आलेल्या दोघानी खेचून पोबारा केला.

शेजारच्या तानाजी भोर याच्या संपर्क कार्यलयाच्या सीसीटीव्हीत घटना कैद झाली. भोर यांनी तात्काळ पोलीस ना माहिती दिली.

सीसीटीव्ही बघून गाडी नंबर व पेहराव लक्षात घेऊन मुंबई हायवे ला सापळा लावला असता शहाड जवळ संशयितांना अटक करण्यात आली असल्याचे समजते.

या कामी डीसीपी पाटील, एसीपी बांगर तसेच देवळाली कँम्प पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख तसेच पोलिस निरीक्षक गिते आदींनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या