Friday, November 22, 2024
Homeक्राईमधूमस्टाईलने तीन तोळ्याची सोन्याची साखळी ओरबाडली

धूमस्टाईलने तीन तोळ्याची सोन्याची साखळी ओरबाडली

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा संगमनेर शहरात धूमस्टाईल दागिने लांबवणार्‍या (Chain Snatching) चोरट्यांचा धुमाकूळ सुरू झाला आहे. शुक्रवारी (दि. 7 जून) रात्री साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास जुन्या पुणे-नाशिक महामार्गालगत (Old Pune Nashik Highway) असलेल्या कुंथुनाथ सोसायटी रस्त्याने जैन मंदिराकडे जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोन्याची (Chain Snatching) साखळी दोन अज्ञात चोरट्यांनी लांबवून धूमस्टाईलने पलायन केल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की सुनीता संतोष मेहता (वय 55) या कुंथुनाथ सोसायटी येथील घरातून जैन मंदिराकडे जात होत्या. त्याचवेळी दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोन्याची साखळी (किंमत 50 हजार रुपये) ओरबाडून धूमस्टाईलने पलायन केले. याप्रकरणी सुनीता मेहता यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार हे करत आहे. दरम्यान, काही दिवसांच्या विश्रातीनंतर चोरट्यांनी (Thieves) पुन्हा महिलांच्या गळ्यातील दागिन्यांना (Jewelry) लक्ष्य केले आहे. त्यामुळे पोलिसांनी वेळीच उपाययोजना करुन चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या