Saturday, March 29, 2025
Homeक्राईमधूमस्टाईलने महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे गंठण ओरबाडले

धूमस्टाईलने महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे गंठण ओरबाडले

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

धूमस्टाईलने महिलांच्या गळ्यातील दागिने चोरून पोबारा करणार्‍या घटनांचा सिलसिला सुरूच असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. चंदनापुरी येथे कामगार तलाठी म्हणून कार्यरत असणार्‍या दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे मिनीगंठण मेंढवणला जात असताना दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात चोरट्यांनी ओरबाडून धूम ठोकल्याची घटना मंगळवारी (दि. 18 जून) सव्वाचार वाजेच्या सुमारास समनापूर शिवारात घडली आहे. सदर चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.

- Advertisement -

भारती अशोक भुरके (वय 50) या तालुक्यातील चंदनापुरी येथे कामगार तलाठी म्हणून कार्यरत आहेत. त्या सव्वाचार वाजेच्या सुमारास सहकारी मैत्रिणींसोबत मेंढवण येथे जात होत्या. त्याचवेळी समनापूर शिवारात पाठीमागून दुचाकीवर आलेल्या अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 22 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनीगंठण ओरबाडले. यावेळी त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरड केली. तेव्हा जवळील नागरिक गोळा झाले. परंतु, चोरटे दुचाकीवरून भरधाव वेगाने निघून गेले. याप्रकरणी भारती भुरके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

महिलांनी दागिने घालावे की नाही ?
कोल्हार-घोटी रस्त्यावरील गणपती मंदिर ते पंचायत समिती कार्यालयापर्यंत नेहमीच दागिने ओरबाडण्याच्या घटना घडलेल्या आहेत. यातील अनेक घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालेल्या आहेत. परंतु, अद्यापही पोलिसांना चोरट्यांना शोधण्यात यश आलेले नाही. त्यामुळे महिलांनी दागिने घालून घराबाहेर पडावे की नाही? असा प्रश्न पडला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शनिशिंगणापूरात सात लाख भाविकांची मांदियाळी

0
सोनई-शनिशिंगणापूर |वार्ताहर| Sonai | Shani Shingnapur श्री क्षेत्र शनिशिंगणापूर (Shani Shingnapur) येथे शनी अमावस्यामुळे आज शनिवारी सात लाख भाविकांनी शनि मूर्तीचे दर्शन घेतले. देवस्थाने शनी...