Friday, May 3, 2024
Homeजळगावचाळीसगाव प.स.चे.उपसभापती अपात्र ?

चाळीसगाव प.स.चे.उपसभापती अपात्र ?

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

चाळीसगाव पंचायत समितीच्या निवडनुकीत दि,२ जानेवारी २०२० राष्ट्रवादी व भाजपाच दोन्हीकडील सदस्य संख्या समान असता, ऐन वेळेस भाजपाच्या गटातील सुनिल पाटील यांना राष्ट्रवादीने फोडुन राष्ट्रवादीच्या पारड्यात मत टाकण्यास भाग पाडले होते. पक्षाने विप बजावले असतानाही पक्षाविरोधात मतदान केले म्हणून भाजपाचे गटनेते व इतर सदस्यांनी याविरोधात जिल्ह्याधिखारी यांच्याकडे सुनिल पाटील यांचे सदस्यत्व रद्द करण्यासदर्भात अपील केले होते. आज त्यांच्या निकाल जिल्हाधिकारी यांनी दिला असून उपसभापती तथा प्रभारी सभापती सुनिल पाटील यांना अपात्र घोषीत केल्याची माहिती ऍड.धनजंय ठोके यांनी दिली आहे.

- Advertisement -

यासंबंधीचे आधिकृत पत्र आज किवा उद्या मिळणार असल्याची देखील त्यांनी माहिती दिली आहे. या निर्णयामुळे चाळीसगावातील राजकिय क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून पुन्हा तालुक्यातील राजकिय समीकरणे बदलणार आहेत. प.स.वर राष्ट्रवादीने पंचायत समितीवर भाजपाचे एक सदस्य फोटुन पुन्हा एकदा आपली सत्ता प्रस्थापीत केली होती. परंतू आता त्यांच्या ताब्यातून पंचायत समिती जाण्याची जाट शक्यता वर्तवली जात आहे. तर सुनिल पाटील या निर्णया विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

पक्षाने अजेंठा व व्हिप बजावलेले असतानाही, सुनिल पाटील यांनी पक्षाविरोधात मतदान केले होते. त्याविरोधात आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे याचिका दाखल केली होती. त्यांचा निकाल लागल असून सुनिल पाटील यांचे पद जिल्ह्याधिकारी यानी अपात्र घोषीत केले आहे. त्यासंबंधीची पत्र उद्या मिळणार आहे.

ऍड.धनजय ठोके

मला जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरवल्याची माहिती मिळाली आहे. परंतू त्या संदर्भात अजुन कुठलेही लेखी आदेश प्राप्त झाला नाही. या आदेशाविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत.

सुनिल पाटील, उपसभापती

- Advertisment -

ताज्या बातम्या