पुतळा काढण्यासंबंधी न.पा.कडून पत्र शांतता व सुव्यवस्थेचे काय? शिवपुतळा तयार होण्यास आठ महिन्यांचा अवधी
मनोहर कांडेकर
चाळीसगाव ।
अनेक वर्षांपासून चाळीसगावकर व लाखों शिवभक्तांची इच्छा असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य पुतळा शहरात नियोजित छत्रपती शिवाजी महाराज चौकात व्हावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शिवभक्तांचा लढा चालू आहे.
भाजपाच्या सत्ताकाळात पुतळा बसविण्यासाठी विशेष प्रयत्न झाले, तसेच पुतळा बनविण्यासाठी दुसर्यांदा वर्कऑर्डरही देण्यात आली. परंतू गेल्या तीन महिन्यांपासून गणपतीच्या काळावंधीत नियोजित जागी देखवाव्यासाठी ठेवण्यात आलेला शिवपुतळा आजुनही तसाच आहे.
हा पुतळा कुठल्याही पध्दतीचे बांधकाम न करता, अंधारीत एक ‘ तात्पुरता ’ चबुतरा उभारुन ठेवण्यात आला आहे. पुतळा रहदारीच्या ठिकाणी असल्यामुळे एखाद्या वाहनाचा धक्का लागून खाली पडू शकतो. त्यामुळे जातीय सखोला व शांतता बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवपुतळा व्हावा ही चाळीसगाव करांची ईच्छा आहे.
परंतू देखाव्यासाठीचा नव्हे तर कायस्वरुपी ! तसेच देखाव्यासाठीचा पुतळा त्वरित काढून घ्यावा याबाबतचे पत्र संबंधीत गणपती मंडळ व पोलीस निरिक्षकांना देण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
चाळीसगाव शहरात अनेक वर्षांपासून लाखों शिवभक्तांची इच्छा असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य पुतळा नियोजित जागेत सिग्नल चौकात (छत्रपती शिवाजी महाराज चौकात) व्हावा, म्हणून चाळीसगाव शहरातील असंख्य शिवप्रेमी बांधवांनी व विविध संघटनानी आंदोलने केली आहेत. शहरातील संभाजी सेनेच्यावतीन पुतळ्यासाठी सलग 21 दिवस आमरण उपोषण आंदोलन केले होते.
शिवपुतळ्यासाठी सत्ताधारी भाजपा व शहर विकास आघाडी यांच्यात सर्वसाधारण सभेत अनेकदा खंडाजणी झाली. त्यानतंर नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक यांनी कुठलाही विरोध न करता एक मताने शिवपुतळा व शिवसृष्टीचा विषय मंजूर करून, औरंगाबाद येथील एका कलाकाराला शिवपुतळा तयार करण्यासाठी वर्कऑर्डर सुद्धा दिली होती.
सत्ताधारी व विरोधकांमध्ये पुतळ्याचे मॉडेल बघण्यासाठी सुध्दा गेले होते. त्यानतंर सत्ताधारी-सत्ताधारी व विरोध यांच्यामध्ये पुन्हा मतभेद होऊन, दिलेली वर्कऑर्डर रद्द नामुष्की येवून, नव्याने निविदा काढण्यात आली. पुन्हा एकमताने निविदा मंजुर करुन, नाशिकच्या गर्गे आर्ट गॅलरीस शिवाजी महाराज पुतळा तयार करण्याचे काम देऊन, वर्क ऑर्डर नुकतीच देण्यात आली.
शिवपुतळा तयार करण्यासाठी वर्क ऑर्डरवरुन न.पा.त. मतभेद सुरु असतानाचा दरम्यानच्या काळात गणपती उत्सव आला. आणि शिवपुतळ्याच्या नियोजित जागी म्हणजेच सिग्लन पाँईट जवळ त्रिकोणी जागेत, शिवपुतळाचा देखावा (प्रतिकृती) म्हणून शिवपुतळा ठेवण्यासाठी शहरातील ‘ शिवछत्रपती शिवाजी गणेश मित्र मंडळा’च्यावीते न.पा.कडे परवागी मागण्यात आली. परंतू पुतळा ठेवल्यास रहदारीस अडथळा निर्माण होईल, असा शेरा त्या पत्रावर संबंधीत आधिकार्यांनी दिला होता. तरी देखील गणपती उत्सावाच्या काळात ‘उत्साहा’ च्या भरात हा भव्यदिव्य शिवपुतळा तात्पुरता चबुतरा उभारुन ठेवण्यात आला.
गणपती उत्सव संपताच हा पुतळा काढणे संबंधीत गणेश मंडळाची जबाबदारी होती. परंतू गेल्या तीन महिन्यांपासून हा पुतळा त्याठिकाणी तसाच ‘धुळ’ खात उभा आहे. पुतळ्याच्या देखभालीची कोन्ही जबाबदारी घेतलेली नाही. काही तरुणानी नुकतीच ह्या पुतळ्याची स्वच्छता करुन, डिजेच्या तालावर आरती देखील केली. पुतळा काढण्यासाठी नगरपरिषदेकडून दि.31 ऑक्टो. रोजी संबंधीत गणपती मंडळलास व पोलीस विभागाला पत्र देखील देण्यात आले आहे, परंतू तरी देखील पुतळा जैसे थे आहे.
हा पुतळा दोन रस्त्याच्या टोकावर त्रिकोणी जागेत ठेवण्यात आल्यामुळे, कुठल्याही क्षणी एखाद्या वाहनाची धडक बसू शकते, आणि त्यामुळे पुतळ्याची तुटफूट होवून शहराची शांतता बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे देखाव्यासाठी ठेवण्यात आलेला पुतळा त्वरित काढून, नवा कायस्वरुपी प्रस्तावित पुतळा बसविण्यात यावा अशी चाळीसगावकरांची इच्छा असून तशा चर्चा देखील गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत.
कलासंचनालयाच्या मंजुरीसाठी शिवपुतळ्याची वर्कऑर्डर
शहरात बसविण्यात येणारा शिवपुतळा तयार करण्यासाठी नाशिकच्या गर्गे आर्ट गॅलरीस नुकतीच कलासंचनालयाच्या मंजुरीसाठी वर्कऑर्डर देण्यात आली आहे. हा संपूर्ण पुतळा तयारी करुन देण्यासाठी गर्गे आर्ट गॅलरीस आठ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
लवकरच कायस्वरुपी शिवपुतळा
शिवपुतळ्याच नियोजित जागी गणपतीच्या कालावधीत देखाव्यासाठी ठेवण्यात आलेल्या पुतळ्याला न.पा.ने परवागी दिलेली नाही. परंतू हा पुतळा काढण्यासाठी आता संबंधीत मंडळाला पत्रे दिले आहे. नियोजित जागी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा बसवायाचा आहे. त्यासाठी वर्कऑर्डरसुध्दा नुकतीच देण्यात आली आहे.
– आशालता चव्हाण, नगराध्यक्षा
देखाव्याच्या पुतळ्याची जबाबदारी कोणाची?
गणपतीच्या कालवंधी देखाव्यासाठी शिवपुतळा ठेवणे हे ठिक होते. परंतू गणपती उत्सव झाल्याबरोबर तो काढून घेणे अपेक्षित होते. भर रहदारीच्या जागी असलेल्या देखाव्याची शिवपुतळ्याची देखभालीची जबाबदारी कोणीची घेतली नाही, त्यामुळे त्यांच्यावर घाण व धुळ साचत आहे. त्यामुळे हा पुतळा काढून कायस्वरुपी पुतळा कसा बसेल यासाठी सर्वांनी प्रयत्न केली पाहिजे.
-लक्ष्मणबापू शिरसाठ, अध्यक्ष-संभाजी सेना
कायस्वरुपी पुतळा बसवा
शहाराच्या शांतता व सुव्यवस्थेसाठी देखाव्यासाठी बसविण्यात आलेला पुतळा त्वरित काढून, त्याठिकाणी कायस्वरुपी भव्यदिव्य असा महारांजाचा पुतळा बसविण्यात यावा.
– गणेश पवार, अध्यक्ष -रतयसेना
देखाव्याचा पुतळा काढण्यासाठी पत्र व्यवहार
गणेशोत्सवात देखावण्यासाठी ठेवण्यात आलेल्या पुतळा काढण्यासाठी आम्ही संबंधी मंडळ व पोलीस प्रशासनास पत्र व्यवहार केलेला आहे. परंतू अजुनही पुतळा काढण्यात आलेला नाही. तसेच शिवसृष्ठीचे काम विज तारांमुळे बंद आहे. त्यासंबंधीत देखील पत्रव्यवहार करण्यात आला असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.
-विजय पाटील, आधिकारी न.पा.