Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाIPL 2023 : कोलकातासमोर आज पंजाब किंग्जचे आव्हान; कुणाचं पारड जड?

IPL 2023 : कोलकातासमोर आज पंजाब किंग्जचे आव्हान; कुणाचं पारड जड?

कोलकाता | Kolkata

आयपीएल २०२३ मध्ये (IPL 2023) आज सोमवारी कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर सायंकाळी ७:३० वाजता आयपीएल २०१२ आणि २०१४ सालच्या चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आपल्या घरच्या मैदानावर पंजाबकिंग्ज संघाशी दोन हात करणार आहे…

- Advertisement -

कोलकाता नाईट रायडर्स संघाचे कर्णधारपद नितीश राणाकडे असणार आहे. पंजाबकिंग्ज संघाचे कर्णधारपद शिखर धवनकडे असणार आहे. कोलकाता आणि पंजाबकिंग्ज संघाचा स्पर्धेतील अकरावा सामान असणार आहे.

आयपीएल २०२३ मध्ये आपल्या सलामीच्या १० सामन्यात कोलकाताने ४ विजय आणि ६ पराभव स्वीकारून ८ गुणांची कमाई केली आहे. पंजाबकिंग्ज संघावर विजय संपादन करून स्पर्धेतील आपला पाचवा विजय संपादन करण्यासाठी कोलकाता उत्सुक असणार आहे.

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागणार? समोर आली ‘ही’ मोठी अपडेट

पंजाबकिंग्ज संघाच्या खात्यात ५ विजय आणि ५ पराभवांसह १० गुण आहेत. बाद फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी दोन्ही संघांना आजच्या सामन्यात विजय अनिवार्य असणार आहे.

दोन्ही संघांमध्ये पंजाबकिंग्ज संघाच्या घरच्या मोहाली येथे झालेल्या पहिल्या साखळी सामन्यात पंजाबकिंग्ज संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार कोलकाता संघावर ७ धावांनी विजय मिळवला होता. या पराभवाची परतफेड करण्यासाठी कोलकाता सज्ज असणार आहे. सलग ५ सामन्यात पराभव झालेल्या यजमान कोलकाता संघाला अखेर विजयाचा सूर गवसला आहे.

राज ठाकरे फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव का घेत नाही? छगन भुजबळांचा बाण

कोलकाता संघाने हैद्राबाद येथील राजीव गांधी मैदानावर झालेल्या आपल्या अखेरच्या सामन्यात विजय संपादन करून विजयी लय प्राप्त केली आहे. आजच्या सामन्यात पंजाबकिंग्ज संघाविरुद्ध आपली विजयाची मोहीम अशीच कायम राखण्यासाठी कोलकाता सज्ज असणार आहे. पंजाबकिंग्ज संघाला आपल्या अखेरच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

हा पराभव विसरून विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाबकिंग्ज उत्सुक असणार आहे. आयपीएलमध्ये पंजाबकिंग्ज विरुद्ध झालेल्या ३२ सामन्यात कोलकाता संघाचा वरचष्मा राहिलेला आहे.

कोलकाता संघाने २० तर पंजाबकिंग्ज संघाने ११ सामन्यात विजय संपादन केला आहे. एका सामन्याचा निकाल लागू शकलेला नाही. पंजाबकिंग्ज आणि कोलकाता संघांमधील लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या