Tuesday, March 25, 2025
Homeभविष्यवेधघरामध्ये कलह आणि अन्नाचा अपमान करू नये

घरामध्ये कलह आणि अन्नाचा अपमान करू नये

आयुष्यात छोट्याछोट्या गोष्टींकडेही लक्ष दिल्यास, दैनंदिन जीवनातील विविध समस्या दूर होण्यास मदत होते. आचार्य चाणक्यांनी जीवनात सुखशांती कायम ठेवणारे काही सूत्र सांगणार्‍या नीतिशास्त्राची रचना केली होती. चाणक्य नीतीचा अवलंब केल्यास प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होऊ शकते. येथे जाणून घ्या, यातील एक चाणक्य नीती…

आचार्य चाणक्य म्हणतात….

- Advertisement -

मूर्खा यत्र न पूज्यन्ते धान्यं यत्र सुसन्चितम्।

दाम्पत्ये कलहो नास्ति तत्र श्री: स्वयमागता॥

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, ज्या घरामध्ये मुर्खांचा नाही तर, बुद्धिमान लोकांचा योग्य मानसन्मान केला जातो, त्याठिकाणी महालक्ष्मी सदैव निवास करते. ज्या घरामध्ये पर्याप्त अन्न असते कोणीही उपाशी झोपत नाही, त्या घरामध्ये महालक्ष्मी सदैव निवास करते.

ज्या घरामध्ये घरी आलेल्या पाहुण्यांचे योग्य स्वागत केले जाते, मांसाहार केला जात नाही, त्याठिकाणी महालक्ष्मी सदैव निवास करते. ज्या घरामध्ये पती-पत्नी सदैव प्रेमाने राहतात, घरात कलह करत नाहीत त्याठिकाणी महालक्ष्मी निवास करते.

जे लोक मूर्खांची पूजा करतात, म्हणजेच मूर्खांना जास्त महत्त्व देतात, त्यांची सेवा करतात ते कधीही यशस्वी होत नाहीत. नेहमी दुःखी राहतात. ज्याठिकाणी धन-धान्याचा अपमान केला जातो, संग्रह केला जात नाही, पती-पत्नी नेहमी भांडत राहतात अशा ठिकाणी देवी लक्ष्मी थांबत नाही. यामुळे मूर्ख लोकांसोबत राहू नये.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : लोणकर मळा येथे CCTV फुटेजमध्ये दोन बिबट्यांचे दर्शन

0
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road येथील जयभवानी रोड, लोणकर मळा, नाशिकरोड येथे मध्यरात्री १ वाजता बिबट्याचे (Leopard) दर्शन झाले व त्याआधी २० मार्च रोजी...