Wednesday, April 29, 2026
HomeनाशिकNashik News : लोणकर मळा येथे CCTV फुटेजमध्ये दोन बिबट्यांचे दर्शन

Nashik News : लोणकर मळा येथे CCTV फुटेजमध्ये दोन बिबट्यांचे दर्शन

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

येथील जयभवानी रोड, लोणकर मळा, नाशिकरोड येथे मध्यरात्री १ वाजता बिबट्याचे (Leopard) दर्शन झाले व त्याआधी २० मार्च रोजी रात्री १.४२ मिनिटाला दोन बिबट्यांचे दर्शन झाले.
सदरचे बिबटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये (CCTV Footage) दिसत आहे.

- Advertisement -

यासंदर्भात मनसे शहर उपाध्यक्ष नितीन पंडित यांनी वनविभागाचे अधिकारी (Forest Department Officer) अहिरराव यांच्याशी संपर्क साधून त्वरित बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा मागणी केली. या मागणीनंतर लोणकर मळा (Lonkar Mala) येथे पिंजरा लावण्यात आला असला तरीही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान, बिबट्या लवकरात लवकर पकडण्यात यावा व रात्रीचे वनविभागातर्फे (Forest Department) फिरते गस्त वाढवण्यात यावे अशी मागणी (Demand) पंडित यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नसबंदी शस्त्रक्रियेला जिल्ह्यात पुरूषांचा ठेंगा!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यात आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येणार्‍या नसबंदी (कुटूंब नियोजन) शस्त्रक्रियेसाठी आजही पुरूषांकडून महिलांना पुढे करण्यात येत आहे. जिल्ह्यात आजही नसबंदीच्या शस्त्रक्रियेला पुरूषांचा ठेंगा...