Saturday, April 18, 2026
Homeनाशिकजिल्ह्यातील घाट विभागांमध्ये उद्या जोरदार पावसाची शक्यता

जिल्ह्यातील घाट विभागांमध्ये उद्या जोरदार पावसाची शक्यता

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील घाट विभागांमध्ये बुधवार दि.19 व 20 जुलै रोजी काही ठिकाणी जोरदार पाऊस येण्याची दाट शक्यता ग्रामीण जिल्हा कृषी हवामान केंद्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी यांच्या वतीने वर्तवीण्यात आली आहे. याबरोबरच मंगळवार दि. 18 जुलै रोजी मध्यम तर शुक्रवार दि.21 जुलै रोजी हलका ते मध्यम पावसाची दाट शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

खरीप भात, नाचणी, वरई, पिकांच्या पेरणी केलेल्या रोपवाटिकेत तसेच कांदा, द्राक्ष, डाळिंब व इतर फळ बागेतील पाणी साचले असल्यास त्वरित बाहेर काढणे गरजेचे आहे. पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. त्याकरिता पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य पध्दतीने चर काढावेत.

Nashik News : मार्कंडेय पर्वतावर दरड कोसळली; दोघे गंभीर जखमी

पाणी साचून राहिल्यामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येईल. भात खाचरात पिकाच्या योग्य वाढीसाठी रोपे लागणीपासून रोपे स्थिर होईपर्यंत १ ते २ सेमी पाण्याची पातळी असावी, असा कृषी सल्ला ग्रामीण कृषी मौसम सेवा जिल्हा कृषि हवामान केंद्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ, विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी यांनी दिला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Ncp Crisis : अजित पवार गट आणि शरद पवारांमधील भेटीत कुठल्या विषयावर चर्चा झाली? समोर आली ‘ही’ मोठी माहिती

ताज्या बातम्या

डंपरची

Nashik News: सी टू भवन समोर भीषण अपघात; डंपरची अनेक गाड्यांना...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधीनवीन नाशिक भागातील खुटवड नगर परिसरातील असलेल्या मधुर स्वीट जवळ एका डंपरने अनेक गाड्यांना धडक दिल्याची भीषण घटना घडली. शनिवारी (दि.१८)...