Friday, February 14, 2025
Homeमुख्य बातम्यापुन्हा अवकाळीचे संकट; हवामान विभागाचा अंदाज

पुन्हा अवकाळीचे संकट; हवामान विभागाचा अंदाज

मुंबई | Mumbai

होळीनंतर राज्यातील तापमानात (Weather Updates) दिवसेंदिवस वाढ होत असून उन्हाच्या तडाख्याने (Heat Wave) नागरिकांचे हाल होत आहेत. मागील आठवड्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) तडाखा दिल्याने द्राक्षांसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानंतर आता पुढील ७२ तासांत राज्यांमध्ये पुन्हा एकदा विजांच्या कडकडाटासह अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे…

- Advertisement -

अभिनेत्री माधुरी दीक्षितला मातृशोक

याबाबत हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, १५ ते १५ मार्च दरम्यान देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत हवामानाचे अनेक रंग पाहायला मिळणार आहेत.

तसेच आज आणि उद्या जम्मू, काश्मीर, लडाखमध्ये विजांचा कडकडाट (lightning) पावसाची शक्यता आहे. तर १३ आणि १४ तारखेला हिमाचल प्रदेश व राजस्थानमध्ये हवामान खराब असणार आहे. याशिवाय १३ आणि १४ तारखेला उत्तराखंडमध्ये विजांच्या कडकडाटासह अनेक भागात गारपीटीसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच! कार पलटी होऊन २ मुलांसह ३ महिलांचा जागीच मृत्यू

तर १२ ते १८ मार्चपर्यंत अनेक राज्यांमध्ये हवामान (weather) खराब असेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच दक्षिण मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि उत्तर कर्नाटकावर याचा परिणाम दिसून येणार असून १५ ते १६ मार्च दरम्यान मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या