Saturday, July 27, 2024
Homeराजकीयराज्यात काही घडेल यासाठी चंद्रकांत पाटील यांनी साडेचार वर्षे वाट पहावी

राज्यात काही घडेल यासाठी चंद्रकांत पाटील यांनी साडेचार वर्षे वाट पहावी

पुणे(प्रतिनिधी)

मराठा आरक्षणाच्या बाबतीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सातत्याने राज्य सरकारवरवर टीका करत आहे. यावर बोलतांना शरद पवार म्हणाले, राज्याच्या विधानसभेत फडणवीस विधानसभेने आरक्षण संदर्भात ठराव पास केलं, नंतर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. त्यांना विस्मरण झालेलं दिसत. त्यांना खूप कळतं परंतु मलाही थोडफार कळतं असा टोला त्यांनी लगावला. राज्यात अनपेक्षित काहीही घडू शकतं या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर बोलताना पवार म्हणाले, माझ्या त्यांना शुभेच्छा आहे असं काही घडेल यावर त्यांनी साडेचार वर्ष काढावी असा चिमटा त्यांनी काढला.

- Advertisement -

करोनाची लस घेतल्याबद्दल पवारांनी केला खुलासा

सरकार न्यायालयात गेलं आहे आणखी कुणी जात असेल तर ..

मराठा आरक्षणाबाबत बोलताना, सर्वोच्च नायालायातील स्थगिती उठवणे गरजेचे असून घटना पीठाकडे सुनावणी जावी यासाठी सरकार आग्रही आहे. सरकार न्यायालयात गेलं आहे. आणखी कुणी जात असेल तर जावं 10 जणांनी जावं असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी पार्थ पवार यांचे नाव न घेता लगावला. सरकार असो वा राष्ट्रवादी स्थगिती उठवावी हीच आमची भूमिका आहे. मराठा समाजातील तरुणांची अस्वस्थता कमी व्हावी यासाठी आग्रही , प्रयत्नशील आहोत मात्र, आत्महत्या करणं योग्य नाही असेही ते म्हणाले.

बाबरी प्रकरण:निकाल आश्चर्य जनक

बाबरी मशिद विध्वंस प्रकरणी न्यायालयाने जो निर्णय दिला तो आश्चर्यजनक आहे असे सांगत कल्याण सिंग यांनी आश्वासन पाळलं नाही असे पवार म्हणाले. माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांची अस्वस्थता योग्य असून आता वाराणसी, मथुरा चर्चा सुरू झाली आहे. देशाचं सामाजिक ऐक्य कसं टिकणार ही चिंता असल्याचे त्यांनी नमूद केलं

- Advertisment -

ताज्या बातम्या