Thursday, May 30, 2024
Homeमुख्य बातम्याचंद्रकांत पाटील म्हणाले 'बाबरी पाडायला एकही शिवसैनिक नव्हता'; संजय राऊत म्हणतात, 'आता...

चंद्रकांत पाटील म्हणाले ‘बाबरी पाडायला एकही शिवसैनिक नव्हता’; संजय राऊत म्हणतात, ‘आता डॉ. मिंधेंनी बोलावं’

मुंबई | Mumbai

राज्यात सध्या भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे गटामध्ये आरोप आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू आहे. असे असतानाच बाबरी मशीद पाडण्यात (Babri Masjid Demolition) एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असं वक्तव्य भाजप (BJP) नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं आहे.

- Advertisement -

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून सत्ताधारी भाजपा-शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात खडाजंगी सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावरून एकीकडे भाजपाला लक्ष्य केलं असताना दुसरीकडे त्यांनी शिंदे गटावर परखड शब्दांत टीकास्र सोडलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंची, शिवसैनिकांची बाबरी पाडण्यात कोणतीही भूमिका नाही असं चंद्रकांत पाटील म्हणतायत. बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरीला शिलेदार पाठवले नव्हते असं ते म्हणतायत. आता यावर जे काही त्यांच्या मांडीला मांडी किंवा अजून काय लावून सरकारमध्ये बसलेत आणि काल त्यांच्या चड्डीची नाडी पकडून जे अयोध्येत हातात धनुष्यबाण घेऊन फिरत होते त्या मिस्टर डॉक्टर मिंधे आणि त्यांच्या ४० लोकांचं काय म्हणणं आहे? आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार वगैरे जे तीर ते मारत असतात, त्यांच्याकडून मला प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

आता प्रश्न हाच आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुंत्वाच्या विचाराचे आम्हीच पाईक आहोत असे बोलणारे सरकार जमा ४0 मिंधे काय करणार? काल याच बाळासाहेब विरोधकांच्या चड्डीची नाडी पकडून अयोध्येत जाऊन आले. साहेबांच्या अपमाना विरोधात कोण दांडका उचलणार? नालायक लेकाचे!गुलाम! अशा शब्दात संजय राऊत यांनी ट्विट केलंय.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटली?

त्यावेळी ढाचा पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की होय, याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी मी घेतो म्हणजे काय? बाळासाहेब ठाकरे तिथे गेले होते, शिवसेना तिथे गेली होती की बजरंग दल तिथे होतं? कारसेवक कोण होते? कारसेवक हे बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली गेले होते. ते असं म्हणत नव्हते की आम्ही बजरंग दलाचं नाव घेणार नाही. ज्यांनी बाबरी पाडली, ते कदापि शिवसैनिक नव्हते, असं चंद्रकांत पाटील यांनी मुलाखतीत म्हटलं होतं.

- Advertisment -

ताज्या बातम्या