Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यात झुंडशाही सुरु, हिंमत असेल तर...; शाईफेकनंतर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया

राज्यात झुंडशाही सुरु, हिंमत असेल तर…; शाईफेकनंतर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया

पिंपरी चिंचवड | Pimpri Chinchwad

काल पैठण (Paithan) येथे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil) यांनी संतपीठाच्या कार्यक्रमातभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे.

- Advertisement -

चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात राज्यात विविध संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. यानंतर पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.

मात्र काही वेळापूर्वीच पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. याबाबत चंद्रकांत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले की, मी कुणालाही घाबरत नाही. महाराष्ट्रात सध्या झुंडशाही सुरु आहे. शब्दाला शब्दांनी उत्तर द्यावे. माझ्यावर भ्याड हल्ले सुरु आहेत. हिंमत असल्यास समोर या, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दरम्यान, शाईफेक करणाऱ्यांपैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या