Tuesday, May 21, 2024
Homeनगरराजकारणात काहीही घडतं, आगामी मुख्यमंत्री कोण याची वाट बघू- बावनकुळे

राजकारणात काहीही घडतं, आगामी मुख्यमंत्री कोण याची वाट बघू- बावनकुळे

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

राजकारणात, समाजकारणात जर तर याला काही अर्थ नाही. देवेंद्र फडणवीस व भाजपा वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील. तो भावी मुख्यमंत्री होईल. एकनाथ शिंदे यांनी कधीच मुख्यमंत्री करा म्हणून म्हटले नव्हते. त्यांनाही वाटलं नव्हतं. पण राजकारणात काहीही घडतं. त्यामुळे आगामी मुख्यमंत्री कोण! त्याची वाट बघू, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

- Advertisement -

शिर्डीत शासकीय विश्रामगृहावर कार्यकर्त्यांची व भाजपा पदाधिकार्‍यांची बैठकी दरम्यान ते बोलत होते. याप्रसंगी चंद्रशेखर बावनकुळे व इतर नेत्यांनी भाजप पक्षाचा संघटनात्मक आढावा घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी खा. सुजय विखे पाटील, माजी आ. स्नेहलता कोल्हे, चंद्रशेखर कदम, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील भाजप नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत, त्या निवडणुका भाजपच्या नेते व मंत्र्यामुळे पडल्या नसून त्या निवडणुकाबाबत सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तीन-तीन याचिका दाखल केलेल्या असल्यामुळे स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहे.

ओबीसी संदर्भात तसेच परस्पर जागा वाढवल्यासंदर्भात आणि लोकसंख्येची वाढ न बघता जागा वाढवल्या या संदर्भात या याचिका दाखल आहेत व उद्या यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. निकाल लागला तर दीड महिन्यात या निवडणुका होऊ शकतील, असा अंदाज प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या