मुंबई | Mumbai
महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) चांगले यश मिळाल्यानंतर मविआतील तिन्ही पक्षांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाकडून मुंबईतील रंग शारदा येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्याला उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन करतांना सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्र सोडले होते.
हे देखील वाचा : Uddhav Thackeray : “एक तर तू राहशील नाहीतर मी”; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना गर्भित इशारा
तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) इशारा देतांना उद्धव ठाकरेंनी “राजकारणात एकतर देवेंद्र फडणवीस राहतील किंवा मी राहील”,असे म्हटले होते. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांची फौज त्यांच्यावर तुटून पडली आहे. त्यातच आता ठाकरे यांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी प्र्त्युत्तर दिले आहे.
हे देखील वाचा : Nashik News : जिल्ह्यात आतापर्यंत ‘इतक्या’ महिलांनी भरले ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे अर्ज
यावेळी बोलतांना बावनकुळे म्हणाले की, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण संपविण्यासाठी त्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला. अनेक षडयंत्र रचली होती, जंगजंग पछाडले होते. पण मायबाप जनतेच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरे देवेंद्रजींना तुरुंगात टाकू शकले नाहीत. उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसला, तुरुंगात टाकण्यासाठी प्रयत्न केला.आता त्यांना संपविण्याची अहंकारी भाषा करत आहेत. मात्र, फडणवीसांचे राजकारण संपविण्यासाठी उद्धव ठाकरेंना १०० जन्म घ्यावे लागतील”, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.
हे देखील वाचा : Yashashri Shinde Murder Case : आरोपी दाऊद शेखला पोलीस कोठडी; हत्येचे कारणही सांगितलं
तसेच लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना (Candidate) मिळालेल्या मुस्लिम (Muslim) आणि ख्रिश्चन समाजाच्या मतांवर उद्धव ठाकरे हे फडणवीस यांना पाहून घेऊ अशी भाषा करत आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी उद्धव ठाकरेंची ही भाषा ऐकली असती तर त्यांना काय वाटले असते, असा सवालही यावेळी बावनकुळे यांनी विचारला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा