Thursday, September 19, 2024
Homeनगरचार्जिंग स्टेशनला वीज देण्यास महावितरणची टाळाटाळ

चार्जिंग स्टेशनला वीज देण्यास महावितरणची टाळाटाळ

ई-बस प्रकल्प लांबणीवर पडण्याची शक्यता

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

पीएम ई-बस सेवेमार्फत नगर शहरासाठी 40 ई- बसेस उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी महापालिका चार्जिंग स्टेशन उभारत आहे. मात्र महावितरणकडून अद्याप चार्जिंग स्टेशनच्या प्रस्तावित जागेपर्यंत वीज पुरवठा उपलब्ध झालेला नाही. त्यासाठी आवश्यक उच्चदाब वाहिनीचे काम करण्यास महावितरण कंपनीकडून टाळाटाळ होत असल्याने ई-बस प्रकल्प लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

चार्जिंग स्टेशनसाठी महापालिकेने केडगाव येथील अडीच एकर जागा निश्चित केली आहे. तेथे वीज भार मंजूर झालेला आहे. मात्र, सोनेवाडी सब स्टेशन पासून महापालिकेच्या सबस्टेशन पर्यंत अद्याप विजेचा पुरवठा करणारी उच्चदाब वाहिनी टाकण्यात आलेली नाही. या कामाचा खर्च केंद्र सरकार करणार असून हा निधी थेट महावितरणकडे वर्ग होणार आहे. तसा निर्णय केंद्र सरकारने दिलेला आहे. असे असतानाही महावितरण कामाची रक्कम व अनामत रकमेसाठी महापालिकेशी पत्रव्यवहार करून वेळकाढूपणा करत आहे. परिणामी, योजना मार्गी लागण्यासाठी नगरकरांना प्रतिक्षाच करावी लागणार आहे.

केडगाव येथील प्रस्तावित चार्जिंग स्टेशन व बस डेपोपर्यंत उच्चदाब वाहिनीचे काम करण्यासाठी महावितरणकडे महापालिकेचा पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी जून व जुलै महिन्यात आयुक्तांकडून पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. महावितरणकडून अद्याप या कामाची निविदा प्रक्रियाही प्रसिध्द झालेली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या