Friday, May 3, 2024
Homeजळगावबोदवड प्रशासनातील चौखांब... संक्रमणाला ठेवताय चार हात लांब!

बोदवड प्रशासनातील चौखांब… संक्रमणाला ठेवताय चार हात लांब!

पुरुषोत्तम गड्डम

बोदवड । Bodwad

- Advertisement -

बोदवड तालुक्यातील कोरोना संक्रम आज मितीस नियंत्रणात येत आहे. छोट्या तालुक्यात सुमारे 40 हजारावर स्वॅब घेऊन ‘स्पे्रडिंग’ रोख्यात प्रशासनाला यश येत आहे. या उपलब्धीसाठी चारही विभागाची टीम प्राधान्याने काम करीत असली तरी त्यामागील दिशादर्शन बोदवड प्रशासनातील चौखांबांचे आहे. आणि हे चौखांब आहेत….. तहसिलदार प्रथमेश घोलप, पोलीस निरिक्षक राहुल गायकवाड, मुख्याधिकारी नगरपंचायत चंद्रकांत भोसले आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज चौधरी यांच्यासह त्यांच्या टीमला बोदवडकरांचा सलाम!

कोरोना संक्रमणाचा कहर सर्वत्र हाहाकार निर्माण करीत आहे. ज्या कुटूंबाच्या दरवाज्यावर कोवीडने ‘दस्तक’ दिली. त्यालाच या भयावह रोगाचा तडाखा काय असतो हे वास्तव आहे. याशिवाय जे जागरूक नागरीक आहेत. ते सुध्दा ‘माझे कुटूंब – माझी जबाबदारी’ या संकल्पनेत वावरून प्रशासनाला साथ देत आहेत. मात्र अजुनही अनेक नागरिक अशा गंभीर काळात सरकारी निर्देशांचे पालन करीत नसल्याने प्रशासनाला सतर्क होणे आवश्यक झाले आणि बोदवड तालुक्यातील प्रशासन कोविड संक्रमण रोखण्यासाठी अगदी मनापासून कर्तव्य बजावित आहेत.

कालपर्यंत बोदवड तालुक्यात एकूण 39 हजार 835 लोकांचे स्वॅब चाचणीसाठी घेण्यात आले होते. त्यात 36 हजार 951 लोक निगेटीव्ह आलेत. आतापर्यंत 2 हजार 884 रूग्ण कोरोना पॉझीटीव्ह म्हणून आढळलेत. त्यापैकी 2 हजार 619 रूग्ण बरे होऊन घरी गेलेत. म्हणजे आता पर्यंत 265 लोक दुर्दैवाने कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले.

लोकप्रतिनिधींचेही सहकार्य बोदवड तालुक्यातील बहुतांशी लोक सामान्य ते गरीब स्थितीतील आहेत. ही जाणीव प्रशासनाला आहे.

– तहसीलदार

त्यासाठी आर्थिक दंडाची तरतूद असतांनाही, विनाकारण फिरणार्‍यांचे स्वॅब घेऊन तपासणी केली जाते. नागरीकांची जागृती आणि प्रबोधन करतांना काही ठिकाणी अडचणी येतात. पण पोलीस प्रशासन, नगरपंचायत मुख्यालय, आरोग्य विभाग आणि आमचे तहसील कर्मचारी यांच्या सहकार्याने अडचणी सोडवित आहोत.

विशेष महत्त्वाचे म्हणजे तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि आमदार या सर्वांचे या कामी मार्गदर्शन व सहकार्य मिळत असल्याने समाधानी आहोत. अशी प्रतिक्रिया बोदवड तहसिलदार प्रथमेश घोलप यांनी दिली.

पोलीस मित्रांची मदत बोदवड तालुक्यातील कोरोना संक्रमण रोखण्यासाठीची जबाबदारी पाहता, पोलीसांची कुमक अपूर्ण पडत आहे. त्यामुळे कोवीड चाचणीसाठी गावकर्‍यांना सेंटरपर्यंत आणणे अडचणीचे ठरत होते. त्याकरिता तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये स्वेच्छेने पुढे येणार्‍या होतकरू तरूणांसाठी पोलीस मित्र ही संकल्पना राबविली. त्याद्वारे लोकांचे समुपदेशन करणे सहज झाले.

– पोलीस निरिक्षक

लग्न, जेवणावळी, अकारणची गर्दी टाळण्यासाठी पोलीसी खाक्या वापरावा लागतो पण त्यात कुणालाही दुखावण्याचा हेतू नसतो. तरीही काम नसतांना फेरफटका मारणार्‍यांची संख्या कमी होत नसल्याने त्यांची चाचणी करण्याचा सपाटा सुरू केला आहे. आता जनताही पोलीसांना समजून घेत असल्याने आमचे कर्मचारी सुध्दा हिंमतीने कामाला लागले आहेत. अशी भावना बोदवड पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी व्यक्त केली.

कर्मचारी फ्रंटवर बोदवड नगरपंचायतीची दैनंदिन कामे सांभाळून कोरोना संक्रमण रोखण्यासाठी नगरपंचायत कर्मचारी कामाला लागले आहेत. बोदवड शहरात तालुक्यातून अन्य गावातून येणार्‍या गावकर्‍यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पोलीसांच्या सहकार्याने गर्दी नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे. परंतू नागरीकांनीच स्वत:हून आपल्या जबाबदारीचे भान ठेवून वागल्यास प्रशासनाचा अतिरिक्त ताण कमी होईल. अशी भावना बोदवड नगरपंचायत मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी व्यक्त केली.

– मुख्याधिकारी

सहकार्‍यांवर मदार – आरोग्याधिकारी

बोदवड तालुक्यातील लोकसंख्या बघता ग्रामीण रूग्णालय आणि एणगाव व येवती प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या डॉक्टर्स व कर्मचार्‍यांवर आरोग्य व्यवस्थापनाची मदार आहे. ग्रामीण रूग्णालयातील डॉ.अमोल पवार, डॉ.अमोल गिरी आणि त्यांना सहकार्य करणारे डॉ.सोनवणे (जामठी), डॉ.श्रावणे, डॉ.कल्याणी चौधरी, डॉ.शिल्पा शर्मा, डॉ.शिवानी पाटील आणि डॉ.अरूण सपकाळ आणि आरोग्य कर्मचारी सेवा देत आहेत. एणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.कपिल पवार, डॉ.संदिप जैन आणि येवती प्राथमिक केंद्रात डॉ.अजय सपकाळ, डॉ.सुरेखा तेली आपल्या सहकार्यासोबत आरोग्य व्यवस्थापन सांभाळत आहेत. तालुक्यातील सुमारे 82 आशा सेविका आणि प्राथमिक शिक्षक सुध्दा याकामी मदत करीत आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतीगृहात सरकारी कोवीड सेंटर सुरू आहेत. त्याठिकाणी डॉ.अपर्णा मुतरकर, डॉ.अविनाश पाटील, डॉ.अक्षय मोटे, डॉ.जोवेरिया खान, डॉ.सुधीर वाघ, डॉ.करण पढार, डॉ.रश्मी वानोरे, डॉ.अमिता पाटील आणि डॉ.हर्षल विजय पाटील व सहकारी आरोग्य व्यवस्थापन सांभाळत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या