Sunday, December 15, 2024
Homeनाशिकशासकीय योजनांच्या नावाखाली अनेकांची फसवणूक

शासकीय योजनांच्या नावाखाली अनेकांची फसवणूक

नाशिक | Nashik

अधिकारी असल्याचे सांगत शासकीय योजनांच्या (Government schemes) नावाखाली नागरिकांना गंडा घालणार्‍या तिसर्‍या संशयिताच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे…

- Advertisement -

या प्रकरणी संशयित विजय पुंडलिक खैरनार (Vijay Khairnar) (41, रा. लासलगाव रेल्वे स्टेशनजवळ (Lasalgoan Railway Station), टाकळी विंचुर ता.निफाड) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 29 ऑगस्टपर्यंत त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद, समाजकल्याण विभागातील (Social Welfare Department) वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या नावाखाली नागरिकांना गंडा घालण्याचा प्रकार चांदवड तालुक्यात (Chandwad Taluka) ऑक्टोबर 2020 मध्ये उघडकीस आला.

याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात (Chandwad Police Station) बनावट ग्रामसेवक केशव कुर्‍हाडे (Keshav Kurhade) याच्यासह गुन्ह्यातील मुख्य संशयीत विजय खैरनार व स्नेहा पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

चांदवड पोलिसांनी पंचवटी परिसरात (Panchavti Area) त्यांच्या कार्यालयाची झाडाझडती घेत संगणकासह पावतीपुस्तके, जिल्हा परिषदेची मोहोर, समाजकल्याण समितीच्या नावाचा शिक्काही जप्त केला होता.

या गुन्ह्यातील चार संशयितांपैकी दोघांची मध्यवर्ती कारागृहात (Central Jail) रवानगी झाली. त्यानंतर विजय खैरनार व स्नेहा पाटील यांच्या मागावर पोलीस होते. बुधवारी (दि.25) रात्री विजय खैरनार हा आपल्या घरी परतल्याची माहिती पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) येथील पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी विजयला ताब्यात घेतले आणि चांदवड पोलिसांकडे सोपवले.

पोलिसांनी गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणातील चौथी संशयित महिला स्नेहा पाटील अजूनही फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. पुढील तपास चांदवडचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या