Tuesday, June 17, 2025
Homeजळगावलग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवत फसवणूक

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवत फसवणूक

एरंडोल Erandole प्रतिनिधी

  तालुक्यातील विखरण येथील एकाने जळगाव येथील पती पासुन विभक्त महीलेला (divorced woman) सोबत तब्बल तिन वर्ष संबंध ठेवत लग्न करण्याचे आमिष (lure of marriage) दाखवून शारीरिक संबंध (Physical relationship) ठेवल्याने त्याच्या विरोधात महिलेने अट्रोसिटी (Crime of Atrocity)चा गुन्हा दाखल केला आहे. 

- Advertisement -

जळगावच्या म्हाळसेची ही आहे VISUAL STORY, स्टोरीत नथीचा नखरा करतोय सर्वाना घायाळविद्यार्थिनीचा फोटो इंस्टाग्रामवर टाकून विनयभंग

    जळगाव येथील पिंप्राळा हुडको परिसरातील रहिवासी ३५ वर्षीय महिला ही साड्या विक्रीचा व्यवसाय करते.तिला साड्या घेण्यासाठी नेहमी जळगाव येथुन सुरत जावे लागायचे याप्रसंगी २०२० मध्ये तिचे प्रवासा दरम्यान एरंडोल तालुक्यातील विखरण येथील अंकुश मारुती महाजन या इसमासोबत ओळख झाली व ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले

VISUAL STORY # मानसी नाईक पुन्हा नववधू ? VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरणशेजार्‍याला पोरंग झाल म्हणून आपण पेढे वाटायचे का?

तसेच यावेळी सदर महिला ही विवाहीत होती.तिला दोन मुली पण आहेत.त्या दोघींना मी सांभाळून घेईल असे आमिष दाखवून एरंडोल जळगाव हायवे क्र.६ वरील रस्त्यावरील ओम शिवरत्न फॉर्म हाऊस वर नेऊन सतत तिन वर्ष शारीरिक संबंध ठेवले तसेच अंकुश याने सांगितल्याने दि.१७ जानेवारी २०२३ रोजी सदर महिलेने आपल्या पतीला पंच फारकत दिली.

जळगावचा पारा 45 अंशावरनांद्रा, वावडदा, सावखेड्यात शॉर्टसर्किटमुळेे पिकांना आग

त्यानंतर देखील अंकुश याने सदर महिलेस लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले.शेवटी अंकुश याने लग्नास नकार दिल्याने सदर महिलेने एरंडोल पोलीस स्टेशनला अंकुश विरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवत फसवणूक केल्याने अट्रोसिटी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी राकेश जाधव हे करीत आहे.

चोरून काढलेल्या फोटोंचा गैरफायदा : अत्याचार करीत विवाहितेला केले गरोदर

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : बदलीसाठी बोगस ‘आंधळे, पांगळे’ होणार्‍यांवर आता फौजदारी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातंर्गत बदली प्रक्रियेतून सुटका व्हावी अथवा सोय व्हावी, यासाठी बोगस अपंगत्व प्रमाणपत्र, घटस्फोट, परितक्त्या असण्याची बोगस कागदपत्रे रंगवणार्‍या प्राथमिक शिक्षकांविरोधात आता...