Tuesday, June 25, 2024
Homeराजकीय"आम्ही पुन्हा बॅगा घेऊन आलो आहोत"; राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची नाशकात...

“आम्ही पुन्हा बॅगा घेऊन आलो आहोत”; राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची नाशकात हेलीपॅडवर तपासणी

नाशिक | Nashik

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दोन दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) आले होते. त्यावेळी त्यांनी हेलिकॉप्टरमधून उतरतांना लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) दोन बॅगा भरून पैसे आणल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे नाशिक दौऱ्यावर आले असून त्यांच्या दोन बॅगांची हेलिपॅडवर तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे एकप्रकारे त्यांनी राऊतांच्या आरोपांना फेटाळून लावल्याचे पाहायला मिळाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या प्रचारार्थ गंगापूर रोड परिसरात (Gangapur Road) रोड शो होणार आहे. या रोड शोसाठी काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री शिंदे नाशकात (Nashik) दाखल झाले आहेत. यावेळी त्यांचे हेलिपॅडवर आगमन होताच निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून पोलिसांनी (Police) त्याठिकाणी दाखल होत शिंदेंच्या बॅगांची तपासणी केली. यावेळी त्यांच्या बॅगांमध्ये कुठलीही आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे त्यांनी विरोधकांच्या आरोपांना या बॅगा उघड्या करून प्रत्युत्तर दिल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, यावेळी माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “आम्ही पुन्हा बॅग घेऊन आलो आहोत” असं म्हणत त्यांनी संजय राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. तसेच लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात असल्याने अनेक गैरप्रकार होण्याची शक्यता आहे. काही कार्यकर्त्यांनी पैशाचे वाटप होणार असल्याच्या तक्रारीही केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) आणि पोलिसांची यंत्रणा देखील अलर्ट झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या