Sunday, April 27, 2025
Homeब्रेकिंग न्यूजजल्लोष! विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाची मुंबईत विजयी यात्रा

जल्लोष! विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाची मुंबईत विजयी यात्रा

मरीन ड्राईववर क्रिकेट प्रेमींचा जनसागर उसळला

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

भारतीय क्रिकेट संघ टी-२० विश्वचषक जिंकल्या नंतर आज मायदेशी परतला. त्या नंतर भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारतीय संघातील सगळेच सदस्य पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी लोककल्याण मार्गावरील निवासस्थानावर पोहोचले होते. यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाला जगज्जेता करणारा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पंतप्रधानांना अभिमानाने विश्वचषक सुपूर्त केलं. त्यानंतर आज मुंबईत टीम इंडियाचे आगमन झाले.

- Advertisement -

मुंबईतील मरीन ड्राईव ते वानखेडे स्टेडियमपर्यंत भारतीय क्रिकेट संघाची विजयी यात्रा काढण्यात येत आहे. या प्रसंगी क्रिकेट प्रेमींचा महासागर आपल्या भारतीय संघाचे स्वागत करण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे. प्रचंड उत्साह, प्रचंड जल्लोष, यावेळेस क्रिकेट रसिकांमध्ये दिसून येत आहे.रस्त्याच्या दुतर्फा संपूर्ण जनसागर भारतीय क्रिकेट संघाचे स्वागत करण्यासाठी उसळला आहे. थोड्याच वेळात विजयी मिरवणूक वानखेडे मैदानावर पोहचणार आहे.या प्रसंगी पोलिसांकडून विशेष बंदोबस्त करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...