Tuesday, March 25, 2025
Homeनगररासायनिक खतांची कृत्रिम टंचाई करणार्‍यावर कडक कारवाईचा इशारा

रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई करणार्‍यावर कडक कारवाईचा इशारा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यात रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई (Chemical Fertilizers Artificial Scarcity) करणार्‍या कृषी निविष्ठा व कपंनीवर कडक कारवाई करण्याचा इशारा पंचयत समितीचे गुणनियंत्रण निरीक्षक, तालुका कृषी विभाग (Agriculture Department) यांनी दिला आहे. दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हंटले आहे की, श्रीरामपूर तालुक्यात रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई होत असल्याचे शेतकर्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार निदर्शनास आले आहे. यााठी तालुक्यातील खतांच्या साठ्याची तपासणी केली असता, युरिया 1100 मॅट्रिक टन, डी.ए.पी. 105 मॅट्रिक टन, मिश्र खते 1200 मॅट्रिक टन, सिंगल सुपर फॉस्फेट 659 मॅट्रिक टन, एम ओ पी 284 मॅट्रिक टन इतक्या मोठ्या प्रमाणावर खतांचा साठा उपलब्ध असून देखील रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई निर्माण होत आहे, शेतकर्‍यांनी केलेल्या तक्रारीनुसार कंपनी (खत वितरण), व स्वतः काही कृषी निविष्ठा विक्रेते रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई करत आहेत.

- Advertisement -

शेतकर्‍यांच्या मागणीनुसार खत वितरण कंपनी विक्रेत्यांना व विक्रेते शेतकर्‍यांना खताची विक्री करत नाही. शिल्लक नसल्याबाबत तसेच इतर निविष्ठांच्या खरेदीचा आग्रह करत आहेत, याबाबत वारंवार पंचायत समिती, कृषी विभाग व तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडून सूचना व कारवाईचे आदेश दिलेले आहे. शेतकर्‍यांनी रासायनिक खत खरेदीबाबत अवेहलना झाल्यास संबंधित खत कंपनी व विक्रेते यांच्यावर कडक कारवाई करण्यात येवून परवाना रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले असल्याने कृषी निविष्ठा विक्रेते यांनी खत वितरण व विक्री नियंत्रण आदेशाचे पालन करावे, यापुढे तालुक्यातील शेतकर्‍यांना खत खरेदी करत असताना काही अडचणी आल्यास पंचायत समिती कृषी विभाग (Agriculture Department) व तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...