Sunday, February 1, 2026
Homeनगररसायनयुक्त पाण्यामुळे बेलापूर खुर्दमध्ये आजारांची भीती

रसायनयुक्त पाण्यामुळे बेलापूर खुर्दमध्ये आजारांची भीती

पाणी उकळून पिण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

बेलापूर |वार्ताहर| Belapur

गेल्या आठवड्यात प्रवरा नदीच्या पात्रात मळीमिश्रीत रसायनयुक्त पाणी सोडल्याने नदीचे पाणी पूर्णतः लाल-काळे झाले आहे. या दूषित पाण्यामुळे आंबी, दवणगाव परिसरातील मासे मोठ्या प्रमाणात मृत झाले आहेत. तेच पाणी आता बेलापूर बंधार्‍यात साठले आहे. याचा थेट परिणाम बेलापूर खुर्दच्या पाणीपुरवठा करणार्‍या विहिरींवर झाला असून ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर तालुका आरोग्य पथकाने नुकतीच पाण्याची तपासणी करुन अहवाल येईपर्यंत नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

- Advertisement -

प्राप्त माहितीनुसार आंबी आणि नावघाट येथील विहिरींमध्ये दूषित पाण्याचा पाझर झाल्यामुळे नळाला येणार्‍या पाण्याला उग्र वास येत आहे. हे पाणी पिल्यामुळे गावातील नागरिकांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरु झाला आहे. खासगी डॉक्टरांनी देखील हा त्रास दूषित पाण्यामुळेच होत असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे गावात जलजन्य आजारांची साथ पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामस्थांनी तक्रार करताच बेलापूर खुर्दच्या सरपंच सविता राजुळे, उपसरपंच अ‍ॅड.दीपक बारहाते, ग्रामसेवक राजेंद्र मेहत्रे यांनी तातडीने दखल घेतली. ग्रामपंचायतीने तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि तालुका आरोग्य विभाग यांना लेखी पत्राद्वारे या गंभीर परिस्थितीची कल्पना दिली.

YouTube video player

त्यावर श्रीरामपूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांच्या पथकाने तातडीने बेलापूर खुर्द येथे भेट देऊन पाण्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविले आहे. त्याचा अहवाल येईपर्यंत नागरिकांनी पाणी उकळून पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. लिफ्टे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र देशमुख, सुरेश गवई, अतुल जाधव, सी.एच.ओ. श्रीमती. धिवर, एम.पी.डब्ल्यू. गिरीश जाधव आणि ए.एन.एम. पूजा वाघमारे यांचा समावेश होता.

ताज्या बातम्या

IND vs NZ : भारताचा मोठा विजय, न्यूझीलंडचा 46 धावांनी धुव्वा

0
तिरुअनंतपुरम | Thiruvananthapuram टी-20 वर्ल्डकपच्या रणधुमाळीपूर्वी भारतीय संघाने आपली तयारी पूर्ण केल्याचे संकेत दिले आहेत. कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. हा...