Monday, January 26, 2026
HomeनगरShirdi : चेन्नई येथील साईभक्ताकडून साई चरणी सोन्याची छत्री दान

Shirdi : चेन्नई येथील साईभक्ताकडून साई चरणी सोन्याची छत्री दान

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

चेन्नई येथील साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी साईबाबांप्रती असलेला भक्तीभाव व्यक्त करत साईबाबांच्या चरणी अनोखी भेट अर्पण केली आहे. त्यांनी 15 किलो वजनाची आणि 185 ग्रॅम शुद्ध सोन्याची तांब्याची छत्री साईबाबांच्या चरणी अर्पण केली.

- Advertisement -

ही छत्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भिमराज दराडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. आज सकाळी ही छत्री साईबाबांच्या समाधी मंदिरातील मूर्तीवर प्रतिष्ठापित करण्यात आली असून या नव्या छत्रीमुळे मंदिराच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे.

YouTube video player

याच साई भक्ताने यापूर्वीही साईबाबा संस्थानला चेकद्वारे तब्बल 23 लाख रुपयांची देणगी दिली असल्याची माहिती श्री. दराडे यांनी दिली. साईभक्त जितेंद्र उमेडी यांच्या या दानाबद्दल साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दराडे म्हणाले, साईभक्त जितेंद्र उमेडी यांचे हे दान आणि श्रद्धा भाविकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या योगदानातून संस्थानच्या धार्मिक आणि समाजोपयोगी कार्यांना नक्कीच बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

ताज्या बातम्या

स्टॉक

Nashik Crime News: स्टॉक मार्केटला भुलले अन् जाळ्यात अडकले; सहा नाशिककरांचे...

0
नाशिक | प्रतिनिधीशहरातील सहा ‘शिक्षित' व्यावसायिक, उद्योजक, सेवानिवृत्तनागरिकांना सायबर संशयितांनी टार्गेट करुन ‘स्टॉक मार्केट’ मधून अधिक नफा देण्याचे आमिष दाखवत तब्बल १ कोटी ४३...