Saturday, May 4, 2024
Homeनगरधनादेश न वटल्याने कर्जदारास शिक्षा

धनादेश न वटल्याने कर्जदारास शिक्षा

नेवासा (तालुका प्रतिनिधी) –

कर्ज परतफेडीसाठी संस्थेस दिलेला 5 लाख रुपये रकमेचा धनादेश वटला नाही म्हणून श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी

- Advertisement -

या संस्थेच्या कर्जदारास 18 महिन्याची शिक्षा व 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश नगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नगर येथील श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट को-ऑप.अर्बन क्रेडिट सोसायटी या संस्थेचे कर्जदार राम अनिल ठुबे, रा. नेवासाफाटा, ता. नेवासा, जि. अहमदनगर यांनी संस्थेकडून बोअरवेल वाहन खरेदी करणेसाठी 16 लाख रुपये कर्ज घेतले होते. या कर्जाचे परतफेडीसाठी त्याने संस्थेस 5 लाख रुपये रकमेचा धनादेश दिला होता, तो वटला नाही म्हणून संस्थेने निगोशिएबल इन्स्टुमेंट अ‍ॅक्टचे कलम 138 अन्वये आरोपी विरुद्ध फिर्यादी संस्थेतर्फे शाखाधिकारी सुनिल पोपट पेहरे यांनी खटला दाखल केला होता.

या खटल्यात आरोपीने घेतलेला बचाव न्यायाधिशांनी फेटाळून लावला व या कर्जदारास 18 महिन्याची शिक्षा व 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा व सदरची रक्कम न भरल्यास आणखी 6 महिन्याची कैद असा आदेश अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी डी. आर. दंडे यांनी दिला आहे.

फिर्यादी पतसंस्थेतर्फे अ‍ॅड. किशोर राऊत व अ‍ॅड. सौरभ राऊत यांनी काम पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या