Tuesday, November 26, 2024
Homeनगरधनादेश अनादर प्रकरणात कैद व भरपाईची शिक्षा

धनादेश अनादर प्रकरणात कैद व भरपाईची शिक्षा

न्यायालयाचा आदेश || चार धनादेश बँकेत वटले नाही

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

चार धनादेशांच्या अनादर प्रकरणी आरोपीस चारही प्रकरणांमध्ये कैद व भरपाई देण्याचे न्यायालयाने आदेश दिले असल्याची माहिती अ‍ॅड. विक्रम वाडेकर यांनी दिली. येथील अतिरिक्त चीफ जुडीशियल मॅजिस्ट्रेट हेमलता जाधव यांनी नुकतीच धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपी बाबासाहेब उगले (रा. तिसगाव, ता. पाथर्डी) यांना फिर्यादी भूषण शिंदे (रा. सावेडी, नगर) यांची फसवणूक केल्याप्रकरणी चार महिन्यांची कैद व दोन लाख 32 हजार रूपयांची नुकसान भरपाई तसेच नुकसान भरपाई न दिल्यास एक महिना कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

- Advertisement -

याबाबतची माहिती अशी की, फिर्यादी भूषण शिंदे यांनी बाबासाहेब उगले यांच्याशी घरगुती संबंध असल्याकारणाने हातउसने म्हणून रक्कम दिली होती. परतफेड करण्यासाठी उगले याने फिर्यादी यांना धनादेश दिला, परंतु तो बँकेमध्ये न वटल्याकारणाने फिर्यादी यांनी उगलेविरूध्द न्यायालयात दाद मागितली त्यानुसार न्यायालयाने आरोपी उगले यास शिक्षा दिली. फिर्यादी यांच्यावतीने अ‍ॅड. वाडेकर, अ‍ॅड. अतिश निंबाळकर, अ‍ॅड. धैर्यशील उर्फ अजित वाडेकर यांनी काम पाहिले. या व्यवहारासंदर्भात आरोपी यांनी एकूण चार धनादेश दिले होते.

चारही धनादेश बँकेत वटले न गेल्याने आरोपीस चारही प्रकरणांत एकाच वेळी शिक्षा झाली. अ‍ॅड. वाडेकर, अ‍ॅड. निंबाळकर यांनी या प्रकरणात अभ्यासपूर्ण युक्तिवाद करून तसेच साक्षीपुरावा नोंदवून व उच्च न्यायालयातील निकालांचा संदर्भ देऊन फिर्यादीस चारही धनादेश अनादरप्रकरणी न्याय मिळवून दिला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या