Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजChhaava Movie Controversy: रिलीज होण्याआधीच 'छावा' सापडला वादात; "…त्याशिवाय प्रदर्शित होऊ देणार...

Chhaava Movie Controversy: रिलीज होण्याआधीच ‘छावा’ सापडला वादात; “…त्याशिवाय प्रदर्शित होऊ देणार नाही”, शिंदे गटाच्या मंत्र्यांचा इशारा

मुंबई | Mumbai
अभिनेता विकी कौशलचा येऊ घातलेला बहुचर्चित सिनेमा ‘छावा’ वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलच्या नृत्यावर शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त करत आक्षेपार्ह दृश्य वगळण्याची मागणी केली आहे. आगामी छावा चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यावरुन वाद पेटला आहे. यावर आता मंत्री उदय सामंत यांनीही भूमिका घेतली आहे. छावा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना दाखवल्याशिवाय प्रदर्शित करू नये, अशी भूमिका मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे.

मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून म्हटलेय, धर्मरक्षक, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनणे ही आनंदाची गोष्ट आहे. छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहे. मात्र या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याबाबत अनेकांनी मते व्यक्त केली आहेत. हा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना आधी दाखवण्यात यावा त्याशिवाय प्रदर्शित करू नये अशी आमची भूमिका आहे असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

छावा चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि येसुबाई नाचतानाचा सीन दाखवण्यात आला आहे. शंभूराजे आणि येसुबाई लेझीम खेळताना दाखवलेल्या या सीनवर शिवप्रेमींनी आक्षेप नोंदवला आहे. हा इतिहासाचं अपमान केल्याचं म्हणत शिवप्रेमींनी या चित्रपटाचा निषेध करत बंदीची मागणी केली होती. त्यानंतर आता मंत्री उदय सामंत यांनी आपली भुमिका मांडली आहे.

मंत्री उदय सामंत यांनी काय म्हंटले आहे?
मंत्री उदय सामंत यांनी एक्स मीडियावर ट्वीट करत म्हटले आहे की, ‘धर्मरक्षक,स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनणे ही आनंदाची गोष्ट आहे, छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहे. मात्र या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याबाबत अनेकांनी मते व्यक्त केली आहेत. हा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना आधी दाखवण्यात यावा त्याशिवाय प्रदर्शित करू नये अशी आमची भूमिका आहे. महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी तातडीने या बाबत उपाययोजना करून आक्षेपार्ह काही असेल तर काढून टाकले पाहिजे अशी आमची भूमिका आहे. चित्रपट पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, त्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही!’

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...