मुंबई | Mumbai
हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या ऐतिहासिक चित्रपट छावाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘छावा’ सिनेमाच्या ट्रेलरमुळे सिनेमाची उत्कंठा आणखी शिगेला पोहोचली होती. ३ मिनिटे ८ सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये विकी कौशलचा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दमदार अभिनय दिसतोय. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणाऱ्या ‘छावा’ चित्रपटाबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर टीझर, पोस्टरनंतर ‘छावा’ सिनेमाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. लक्ष्मण उटेकर यांची चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर दिनेश विजान निर्मात आहेत. संगीतकार एआर रहमान यांचे संगीत आहे.
विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या ‘छावा’ सिनेमाच्या ट्रेलरमध्ये सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा मुकुट बघायला मिळतो. शेर नही रहा लेकिन छावा जिंदा है! “हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा!”, “जय भवानी”, “मौत के घुंघुरु पहन कें नाचते हैं हम औरंग”, “छत्रपती शिवाजी महाराज को शेर कहते है, और शेर के बच्चे को छावा” अशी थरारक वाक्य ऐकायला मिळतात. या सिनेमात रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. लढाई करताना विकीचा रुद्रावतार पाहायला मिळतो. चहुबाजूंनी ‘हर हर महादेव’च्या शिवगर्जना सुरू होतात. सिनेमाच्या ट्रेलरमधली अनेक दृश्य पाहताना अंगावर काटा येताना राहत नाही. दुसरीकडे औरंगजेब संभाजी महाराजांना रोखण्यासाठी योजना आखताना दिसतो. ३ मिनिटं ८ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये विकी कौशलचा दमदार अभिनय बघायला मिळतोय.
कोणी केली भुमिका?
ट्रेलरमध्ये विकी कौशलचा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दमदार अभिनय करताना दिसत आहे. या ट्रेलरमध्ये अनेक कलाकार दिसत आहेत. याशिवाय औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्नाची दहशतही पाहायला मिळतेय. चित्रपटात विकीसह दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणार आहे. याशिवाय अनेक संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे यांसारखे मराठी कलाकार सुद्धा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.
सिनेमाचा ट्रेलर भव्यदिव्य असून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. या सिनेमात छत्रपती शिवरायांची भूमिका कोण साकारणार, याविषयी अजून उलगडा झाला नाही. तरी या सिनेमात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची झलक बघायला मिळतेय.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा