मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते (Ajit Pawar Group) आणि मंत्री छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईमधील (Mumbai) सिल्वर ओक या निवासस्थानी दाखल झाले आहेत. काल बारामतीच्या सभेतून छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर हल्लाबोल करत गंभीर आरोप केला होता.
हे देखील वाचा : Chhagan Bhujbal : “त्या दिवशी बारामतीतून फोन आला आणि…”; भुजबळांचा शरद पवारांवर गंभीर आरोप
त्यानंतर आज थेट ते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे अचानक शरद पवार यांना का भेटण्यासाठी आले? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे या भेटीबाबत अनेकांची उत्सुकता वाढली आहे.
हे देखील वाचा : विधानपरिषदेच्या निवडणुकीत ‘क्रॉस व्होटिंग’ करणाऱ्यांमध्ये काँग्रेसच्या ‘या’ आमदारांच्या नावाची सर्वाधिक चर्चा
दरम्यान,अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर आज पहिल्यांदाच शरद पवार आणि छगन भुजबळ यांची भेट होत आहे. तसेच राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद सुरू असून या संदर्भात ही भेट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा