Tuesday, February 3, 2026
Homeनगरभुजबळांच्या टीकेवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया म्हणाले, दिवाळीनंतर…!

भुजबळांच्या टीकेवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया म्हणाले, दिवाळीनंतर…!

राहाता |प्रतिनिधी| Rahata

बीडमध्ये शुक्रवारी झालेल्या ओबीसी एल्गार सभेत राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सरकारमधील आपलेच सहकारी आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर केलेल्या धारदार टीकेला (Criticism) विखे पाटलांनी संयमित पण स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे. भुजबळ यांनी विखे पाटलांवर विखार पसरवला अशी एकेरी टीका (Criticism) केली असताना विखे पाटलांनी मात्र मी भुजबळांना भेटणार आहे आणि त्यांना समजावून सांगणार आहे, अशी महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे.

- Advertisement -

भुजबळ यांनी विखे आला आणि संपूर्ण महाराष्ट्रात विखार पसरवून गेला. गेला तर गेला, जीआर काढला, अशा शब्दांत टीका केली होती. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले की, छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते असून मी त्यांचा आदर करतो. मराठा आरक्षणाच्या विषयावर बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले आहे की, आमच्या डीएनएमध्ये ओबीसी आहे. त्यामुळे कोणीही गैरसमज करू नये. आम्ही कायद्याच्या चौकटीत बसवून मराठवाड्यातील मराठा समाजाचा विषय मार्गी लावला आहे.

YouTube video player

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी आपण स्वतःहून त्यांना भेटणार असल्याचे विखे पाटलांनी स्पष्ट केले. मी भुजबळांना भेटणार आहे आणि त्यांना समजावून सांगणार आहे. सोबत न्यायमूर्ती शिंदे यांना घेऊन जाणार आहे. ते त्यांना सगळं समजावून सांगतील आणि त्यांचा गैरसमज दूर केला जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच आपली भूमिका स्पष्ट करत असताना, ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का न लावता आरक्षणाचा विषय मार्गी लावल्याचे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.

विखे पाटलांनी सार्वजनिक जीवनात ओबीसी-मराठा वादाचे वातावरण असल्याचे आपल्याला वाटत नसल्याचे मत व्यक्त केले. पुरोगामी महाराष्ट्रात सगळे एकत्र राहतात. सार्वजनिक कार्यक्रम एकत्र करतात. आता आपण दिवाळी साजरी करत आहोत. ओबीसी दिवाळी आणि मराठा दिवाळी असे कधी झाले आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे समर्थन केले. जरांगे पाटील यांनी प्रामाणिकपणे आणि निःस्वार्थीपणे आंदोलन चालवले. आम्ही जे काही केले आहे, ते कायद्याच्या चौकटीत बसवून तो विषय मार्गी लावला आहे, असे ते म्हणाले. जरांगेंचे शिक्षण काढणार्‍या पुढार्‍यांवर त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली. दिवाळी संपल्यानंतर ओबीसी नेत्यांना बोलावून न्यायमूर्ती शिंदे यांच्यामार्फत आरक्षणाचा विषय समजावून सांगितला जाईल, असेही विखे पाटलांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

Nashik NCP Politics : राष्ट्रवादीत गटनेतापदावर ‘या’ नगरसेविकेने दावा सांगितला ...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक महापालिकेतील (Nashik NMC) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात गटनेतापदावरून तीव्र अंतर्गत वाद उफाळून आला आहे. माजी नगरसेविका डॉ....