Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजChhagan Bhujbal : "जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं…; भुजबळांचे सूचक विधान करत...

Chhagan Bhujbal : “जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं…; भुजबळांचे सूचक विधान करत अजितदादांची साथ सोडण्याचे संकेत?

चर्चांना उधाण

नागपूर | Nagpur

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्त्वातील महायुती सरकारचा (Mahayuti Government) पहिला मंत्रिमंडळ विस्तार रविवार (दि.१५) रोजी पार पडला. या विस्तारात एकूण ३९ आमदारांना (MLA) मंत्रि‍पदाची शपथ घेतली, त्यामुळे मंत्रिमंडळाची संख्या ४२ वर गेली आहे. भाजपच्या कोट्यातील एक मंत्रीपद रिक्त आहे. या विस्तारात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे ते नाराज असून त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. अशातच आता भुजबळ यांनी एक सूचक वक्तव्य करत अजित पवारांची साथ सोडण्याचे संकेत दिले आहेत.

- Advertisement -

भुजबळ यांना माध्यम प्रतिनिधींनी तुम्हाला मंत्रिपद मिळालं नाही,तुम्ही अधिवेशनात थांबणार नाही का? तुमची आता पुढची भूमिका काय आहे? असे विचारले असता त्यावर त्यांनी आपल्या स्टाईलने उत्तर दिले. ते म्हणाले “आता बघू… जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना”, असे म्हणत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोठं सूचक विधान केलं. तसेच मंत्रिपदाबाबत माझ्या नावाची चर्चा होती,पण ऐनवेळी माझं नाव का काढलं मला माहीत नाही. परंतु, सात-आठ दिवसांपूर्वी माझं वरिष्ठांशी बोलणं झालं होतं. त्यावेळी ते (अजित पवार आणि इतर) मला म्हणाले, तुम्हाला राज्यसभेवर जायचं असेल तर आम्ही तुम्हाला राज्यसभेवर पाठवू. मी त्यांना म्हणालो, जेव्हा मला राज्यसभेवर (Rajyasabha) जायचं होतं तेव्हा तुम्ही मला ती संधी दिली नाही.

तेव्हा तुम्ही मला सांगितलं की विधानसभेची निवडणूक (Vidhansabha Election) लढवा. तुम्ही विधानसभा निवडणूक लढवलीच पाहिजे. तुमच्याशिवाय येवला मतदारसंघाची (Yeola Constituency) निवडणूक जिंकता येणार नाही. तुम्ही लढत असाल तर पक्षाला जोम येईल. पक्ष व कार्यकर्ते राज्यभर जोमाने काम करतील. त्यामुळे तुम्ही लढलंच पाहिजे, असं मला सांगितलं. तुमच्या त्या सल्ल्यानंतर मी विधानसभा निवडणूक लढवली. येवल्यातील जनतेने मला मोठा आशीर्वाद देत निवडून दिलं. आता मी तुमच्या सांगण्यावरून आमदारकीचा राजीनामा (Resignation) देऊ शकत नाही. तसं केल्यास माझ्या मतदारसंघातील जनतेची प्रतारणा होईल, असे भुजबळांनी म्हटले.

भुजबळांनी राज्यसभेची ऑफर नाकारली

पक्षाच्या वरिष्ठांनी दिलेल्या राज्यसभेच्या ऑफरवर बोलतांना भुजबळ म्हणाले की,”राज्यसभेवर जाण्यासाठी मला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल. मी तसं केल्यास माझ्या लोकांसाठी ते दुःखदायक असेल. माझे मतदार रागावणार नाहीत, परंतु निश्चितपणे त्यांच्या मतांची प्रतारणा होईल, जे मी करू शकत नाही. ज्यांनी माझ्यावर जीवापाड प्रेम केलं त्या लोकांशी मी असं वागणार नाही. आठ दिवसांपूर्वी माझ्या वरिष्ठांनी मला राज्यसभेची ऑफर दिली होती. परंतु, मी त्यांना स्पष्टपणे नकार कळवला आहे. मी ओबीसींच्या संरक्षणासाठी मैदानात आलो होतो, घर दारं जाळायला सुरुवात झाल्यानंतर मागासवर्गीयांच्या संरक्षणासाठी उभा राहिलो. त्यावेळी अगोदर राजीनामा दिला होता. त्यामुळे आता जे चुकीचे आहेत त्यांच्यासोबत लढणार आहे, असे भुजबळांनी म्हटले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...