Tuesday, September 17, 2024
Homeब्रेकिंग न्यूजशरद पवारांसोबत भेटीत काय चर्चा झाली? भुजबळांनी पत्रकार परिषदेत सगळचं सांगितलं

शरद पवारांसोबत भेटीत काय चर्चा झाली? भुजबळांनी पत्रकार परिषदेत सगळचं सांगितलं

मुंबई | Mumbai

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची आज मुंबईमधील (Mumbai) सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. यानंतर नुकतीच या दोघांमधील बैठक संपली असून तब्बल अर्धा तास वाट बघितल्यानंतर शरद पवार यांनी भुजबळांना भेटीची वेळी दिली.

हे देखील वाचा : Chhagan Bhujbal : “त्या दिवशी बारामतीतून फोन आला आणि…”; भुजबळांचा शरद पवारांवर गंभीर आरोप

आज शरद पवारांनी फक्त ठाकरे गटाचे सचिव आणि नवनिर्वाचित आमदार मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना भेटीसाठी वेळी दिली होती. त्यानुसार आज नार्वेकर यांनी पवारांची भेट घेतली. यानंतर ते सिल्व्हर ओकवरून निघून गेले. त्यानंतर भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी भुजबळ आणि पवार यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याची माहिती छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हे देखील वाचा : छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर; कारण अद्याप गुलदस्त्यात

यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, “मी शरद पवार यांची वेळ न घेताच सिल्व्हर ओकवर गेलो होते. पण, शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याने ते झोपले होते. त्यामुळे दीड तास थांबावे लागले. तब्बल दीड तास आम्ही चर्चा केली. मी राजकारण करण्यासाठी, आमदार आणि मंत्री म्हणून पक्षीय भूमिका घेऊन आलो नाही. महाराष्ट्रात ओबीसींना आरक्षण देण्याचे काम तुम्ही केले. सध्या राज्यात आरक्षणावरून स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक मराठा समाजाच्या हॉटेलमध्ये आणि ओबीसी, धनगर, वंजारी समाजाच्या दुकानात (Shop) जात नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात शांतता निर्माण झाली पाहिजे त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा अशी विनंती मी पवारांना केली, असे भुजबळ यांनी म्हटले.

हे देखील वाचा : विधानपरिषदेच्या निवडणुकीत ‘क्रॉस व्होटिंग’ करणाऱ्यांमध्ये काँग्रेसच्या ‘या’ आमदारांच्या नावाची सर्वाधिक चर्चा

पुढे भुजबळ म्हणाले की, “या भेटीमध्ये राजकारणाचा (Political) कोणताही मुद्दा नव्हता.आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी मी कोणालाही भेटायला तयार आहे. मराठा, ओबीसी, धनगर यांच्या मागण्या काय आहेत? त्या मी शरद पवार यांच्यासमोर मांडल्या. शरद पवार यांनीही याबाबत पुढाकार घेणार असल्याचे सांगितले आहे. मी दोन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी चर्चा करणार आहे, असे शरद पवार म्हणाले असल्याचेही”, छगन भुजबळ यांनी सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या