Thursday, January 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजशरद पवारांच्या विधानावर भुजबळांची प्रतिक्रिया; बिग ब्रदर, छोटा ब्रदर, मधला ब्रदर जे...

शरद पवारांच्या विधानावर भुजबळांची प्रतिक्रिया; बिग ब्रदर, छोटा ब्रदर, मधला ब्रदर जे काय…

मुंबई | Mumbai
राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी विधान केले होते की, ४ ते ६ महिन्यात आपल्याला सरकार बदलायचे आहे. असे विधान करत महायुतीला इशाराच दिला आहे. “सरकारला अनुदान द्यावेच लागेल, नाही दिले तर रस्त्यावर उतरायला लागेल. चार सहा महिने थांबा मला राज्य सरकार बदलायचे आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे. लोकसभेला साथ दिली त्याबद्दल आभार”, असे शरद पवार म्हणाले आहेत. दरम्यान पवारांच्या या विधानावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांनी ४ ते ६ महिन्यात सरकार बदलायचे आहे असा नारा दिला आहे. त्याबद्दल विचारण्यात आले असता भुजबळांनी महायुतीला चर्चेचे गुऱ्हाळ सुरु न ठेवण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, “लवकरात लवकर युतीतील पक्षांनी एकत्रित बसून तिकीट वाटपाचा निर्णय घ्यायला हवे. ७०, ८० जागा, बिग ब्रदर, छोटा ब्रदर, मधला ब्रदर जे काय असेल तर लवकर ठरवा. शरद पवार कामाला लागले आहेत. त्यांनी प्रचार सुरु केला असून, तशा प्रचाराला आपण सुरुवात करायला हवी. आपण परत तेच चर्चेचे गुऱ्हाळ सुरु ठेवले तर अडचणी निर्माण होतील”, असा इशाराच भुजबळांनी दिला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा : ‘पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा…’ ; रोहित पवारांचा अजित पवारांना सल्ला

YouTube video player

शरद पवार काय म्हणाले होते?
राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन शरद पवार हे आक्रमक झाले आहेत. यावेळी बोलताना शरद पवार यांनी महत्त्वाचे विधान केले होते. “दुधाच्या दरासंबंधी सरकारकडे आपल्याला गाऱ्हाणे मांडावे लागेल. जर आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर रस्त्यावर यावे लागेल. ते केल्याशिवाय गत्यंतर नाही. हे प्रश्न लगेच सुटणार नाहीत. त्यासाठी शेतकऱ्यांनी आम्हाला चार-सहा महिने दिले पाहिजेत. या कालावधीत मला सरकार बदलायचे आहे. सरकार बदलल्याशिवाय आपल्याला पाहिजे ते निर्णय घेता येणार नाहीत,” असे शरद पवार म्हणाले.

‘रास्वसंघच्या टीकेला उत्तर’
भुजबळ म्हणाले की, “त्यांनी अनेकांवर टीका केली आहे. काही लोकांनी तर काँग्रेसचे लोक का घेतले अशीही टीका केली आहे. अशोक चव्हाण, मिलिंद देवरा यांना घेतले आहे. ते म्हणतात ते बरोबर आहे. पण हे तुम्ही महाराष्ट्रातील सांगत आहात. मग भारतातील इतर ठिकाणी काय झाले? तिथेही तुम्हाला धक्का बसला आहे. म्हणून नितीश कुमार. चंद्राबाबू यांना एकत्र घेऊन सरकार स्थापन करावे लागले आहे”.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ajit Pawar Funeral : अलविदा दादा! उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन; शासकीय...

0
बारामती | Baramati राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं काल (बुधवारी) सकाळी ८.४५ च्या सुमारास वयाच्या ६६ व्या वर्षी...