Sunday, July 21, 2024
Homeब्रेकिंग न्यूज'पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा…' ; रोहित पवारांचा अजित पवारांना सल्ला

‘पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा…’ ; रोहित पवारांचा अजित पवारांना सल्ला

मुंबई | Mumbai
राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा १३ जून हा शेवटचा दिवस आहे. असे असतानाच अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळेंविरोधात निवडणूक लढलेल्या सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. देशातील राज्यसभेच्या १० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीवेळी ही जागादेखील भरली जाईल. मात्र, या जागेवरुन कोणाला रिंगणात उतरवायचे, याबाबत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अद्याप एकमत झाले नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच आता रोहित पवार यांनी विधान केले आहे.

- Advertisement -

काय म्हणाले रोहित पवार
“आदरणीय पवार साहेबांना (शरद पवारांना) सोडून एक वेगळे घर वसवले गेले असले तरी त्या घरातील आजची परिस्थिती आणि तिथल्या लोकांची अस्वस्थता बघता सर्वजण किती दिवस एकत्र राहतील हे ब्रम्हदेवही सांगू शकणार नाही. त्यामुळे पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरातल्या विश्वासू व्यक्तीला दिली तरच ती टिकेल इतरांचा काही भरवसा नाही, अशी चर्चा सुरू आहे. म्हणूनच सुनेत्राकाकी किंवा पार्थ यांना अ‍ॅडव्हान्समध्ये शुभेच्छा आणि अभिनंदन!” अशी पोस्ट रोहित पवारांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय आणि ‘पळत्या’ या उपाधीचा रोख नेमका कोणाकडे आहे, याविषयी आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

राज्यसभेच्या या जागेसाठी अजितदादा गटातील जवळपास १० ते १२ नेते इच्छूक होते. मात्र, पक्षांतर्गत छाननी झाल्यानंतर सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांची नावे आघाडीवर आहेत. अजित पवार हे लोकसभेची संधी हुकलेल्या छगन भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी देणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. मात्र पक्षाकडून यासंदर्भात कोणत्याही नावाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या