Friday, May 17, 2024
Homeमुख्य बातम्याउद्या सत्तासंघर्षाचा फैसला; भुजबळांनी दिले 'हे' मोठे संकेत

उद्या सत्तासंघर्षाचा फैसला; भुजबळांनी दिले ‘हे’ मोठे संकेत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली…

- Advertisement -

राज्यात शिंदे सरकार (Shinde Government) स्थापन झाले. मात्र या सरकारचा कायदेशीर पेच सुरूच आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्षाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीसह अनेक विषयांवर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) सुनावणीवर भुजबळ म्हणाले की, दोन्ही पक्षांना असे वाटते आहे की आमच्या बाजूनेच निकाल लागेल. परंतु आपण वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. उद्या कोर्टात (Court) निर्णय लागणार की आणखी काही घटनात्मक बेंच बसेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याआधीच वाटले होते की निर्णय लागेल मात्र तारीख पुढे गेली. घटनापीठही तयार करावे लागू शकते, असे विधान त्यांनी केले आहे.

आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या आरोपावर ते म्हणाले की, करोना (Corona) असल्याने सगळेच, तुम्ही सुद्धा घरी बसले होते. मोदी साहेबांनीच लॉकडाऊन सांगितल्याने आपण धार्मिक सण कसे साजरे करणार होतो? करोना कमी झाल्याने आता धार्मिक स्थळांवर, सांस्कृतिक कार्यक्रमांना गर्दी होत आहे. गणेशोत्सव, नवरात्रात सुद्धा गर्दी होणार असल्याने हे श्रेय भाजपने (BJP) घेता कामा नये. दोन वर्षांचीच आता भरपाई होत आहे, असे ते म्हणाले.

नाशिक-मुंबई रस्त्याबाबत (Nashik-Mumbai Road) विचारणा केली असता ते म्हणाले की, नाशिक मुंबई प्रवासाला सहा तास लागत आहेत. मुख्यमंत्र्यांनी ठाण्याच्या पुढे येऊन बघावं. खूप त्रास आहे खड्डयांचा अजून बुजवले जात नाहीत. महामार्गांची ही परिस्थिती आहे, शहरातही आहे. टोलवाल्यांनी बाउन्सर वगैरे ठेवून वाद घालू नये. पोलीस त्यांची व्यवस्थित खबरदारी घ्यायला समर्थ आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

शिवभोजन (Shivbhojan) केंद्राबाबत भुजबळ म्हणाले की, ‘शिवभोजन केंद्रांचे पैसे अडकले आहेत याबाबत उद्या मी हाऊसमध्ये बोलेल आणि त्यांना सांगेल की ही गरीब मंडळी असून त्यांना वेळेवर पैसे मिळाले नाहीत तर ते बंद पडतील. चांगली योजना असून सरकारने (Government) ती सुरू ठेवावी. सत्तांतरण झाले पण मंत्रिमंडळ विस्तार नव्हता, पालकमंत्री नाहीये आणि आता अधिवेशन सुरू झाले त्यामुळे कोणाकडे याबाबत बोलायचे हेच कळत नाहीये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या