Monday, June 17, 2024
HomeUncategorizedचक्क 'गुगल पे'वर घेतली लाच!

चक्क ‘गुगल पे’वर घेतली लाच!

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

- Advertisement -

नुकत्याच झालेल्या जी-२० परिषदेतील कामांच्या बिलांवर सध्या प्रक्रिया केली जात असून कंत्राटदारांचे लाखो रुपयांचे बिल स्मार्ट सिटी कार्यालयात पडून आहेत. कंत्राटदारांना आपली बिले मिळवण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवाव्या लागत असतानाच एका आरोपीने चक्क हायटेक पद्धतीने गुगल पे ऍपवर लाचेची रक्कम स्वीकारल्याने चांगलीच चर्चा रंगत आहे.   

जी-२० परिषदेसाठी शहरातील भिंती रंगविणाऱ्या गुत्तेदाराचे १ कोटी १३ लाखांचे बिल काढण्यासाठी महापालिका अतिरिक्‍त आयुक्ताच्या स्वीय सहायकाने गुगल पेवरून ६० हजारांची लाच घेतल्याची घटना आज शुक्रवारी रात्री संभाजीपेठेत भागात घडली. यातील एक आरोपी फरार असून पथक त्याच्या शोधात आहे. या घटनेमुळे महानगरपालिकेत एकच खळबळ उडाली आहे.

शहरात जी-२० परिषदेनिमित्त शहरातील भिंतीवर चित्र काढण्याचे कंत्राट नाशिकमधील बोडखे यांना देण्यात आले होते. १ कोटी १३ लाखांचे बिल काढण्यासाठी महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त रणजित पाटील यांचा स्वीय सहायक मनोजकुमार सुभाष मारवाडे याने ५ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. लाच मागत असल्याने बोडखे यांनी महिनाभरापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार नोंदवली होती. तक्रारीवरून पथक हे त्याच्या मागावर होते. मात्र मनोजकुमार हा पथकाला हुलकावणी देत होता. 

शुक्रवारी रात्री तडजोड करून त्याने पहिला हप्ता ६० हजारांचा मित्राच्या फोन पेवर टाकण्याचे सांगितले. संभाजीपेठेत असताना तक्रारदार बोडखे यांनी ६० हजारांची रक्‍कम गुगल पेवरून औद्योगिक वसाहतीतील महेंद्र कदम या कामगाराच्या मोबाईलवर टाकली. माघावर असलेल्या पथकाने मनोजकुमार सुभाष मारवाडे यास ताब्यात घेत साथीदाराचा शोध सुरू केला. मारवाडे याला अटक केल्यानंतर मनपात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणात लाचलुचपत विभागाने अतिरिक्‍त आयुक्‍त रणजित पाटील यांना देखील रडारवर घेतले असल्याचे समजते. 

- Advertisment -

ताज्या बातम्या