Wednesday, January 7, 2026
Homeनाशिक‘जेल’ मधील लाचखाेर डाॅक्टर 'एसीबी'च्या जाळ्यात

‘जेल’ मधील लाचखाेर डाॅक्टर ‘एसीबी’च्या जाळ्यात

३० हजारांची लाच घेतांना एक नाही दाेन डाॅक्टर अडकले

नाशिक। प्रतिनिधी

- Advertisement -

नाशिकराेड मध्यवर्ती कारागृहातील मुख्य वैद्यकीय अधिकारी(सीएमओ) आणि वैद्यकीय अधिकाऱ्यास ३० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रविवारी (दि. १४) रंगेहाथ पकडले. डॉ. आबिद आबू अत्तार (४०) असे सीएमओचे नाव असून त्याचा साथीदार डॉ. प्रशांत एकनाथ खैरनार (४२) यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

YouTube video player

तक्रारदाराचा मित्र नाशिकरोड कारागृहात शिक्षा भोगत आहे. नियमानुसार ६५ वर्षांपेक्षा जास्त वय आणि १४ वर्षे शिक्षा भोगलेली आहे, अशा कैद्यांना शासकीय समिती बाहेर सोडत असते. मात्र या समितीस संबंधित कैद्याचे ‘फिट फॉर सर्टिफिकेट’ची आवश्यकता असते. त्यासाठी डॉ. अत्तार व डॉ. खैरनार यांच्याकडे अर्ज केला असता दोघांनी तक्रारदाराकडे ४० हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

विभागाने सापळा रचला असता दाेघांनी शासकीय पंचासमोर तडजोड करीत तक्रारदाराकडून ४० ऐवजी ३० हजार रुपयांची लाच घेतली. त्यामुळे विभागाने दाेघांनाही रंगेहाथ पकडले आहे. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...