Friday, December 13, 2024
Homeमुख्य बातम्याMaratha Andolan: मराठा आरक्षणाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

Maratha Andolan: मराठा आरक्षणाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

मुंबई |Mumbai

मराठा आंदोलन प्रश्नी मनोज जरांगे हे गेल्या १३ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीच्या पार्श्वभुमीवर मनोज जरांगे यांनी सरकारला विनंती केली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीवर भाष्य करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘मुंबईत सर्वपक्षीय मराठा आरक्षणावर बैठक असेल, तर त्यांना वाकून कळकळीची विनंती आहे की, त्यांनी कुठलीही आड काठी न घालता गोरगरिबांच्या मुलांना आरक्षण कसे मिळेल याचा विचार करावा. त्या मुलांचे घर, त्या मुलांचे गाव, त्यांच्या अंगावर फाटलेले कपडे याचा विचार करावा’.

‘गोरगरीब मुलांच्या बापाचे स्वप्न असते की, आपला मुलगा कुठे तरी नोकरीला लागेल. तुम्ही त्याच्या स्वप्नाचा विचार करा. त्याचे मायबाप बना, पालक बना, त्याच्या विचार करा. तु्म्ही आर्शीवादरुपी आरक्षणावर तोडगा काढा. आमच्या वेदना, आमचा आक्रोश घेऊन बैठकीला जा. उद्या होणारी बैठक यशस्वी करा. मी तुमचा नतमस्तक होईल, असे ते म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या