Thursday, September 19, 2024
Homeनगरअहमदनगर येथून अपहरण केलेल्या बालकाची केली सुटका

अहमदनगर येथून अपहरण केलेल्या बालकाची केली सुटका

संगमनेर शहर पोलिसांची कामगिरी || एकाला केली अटक

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

अहमदनगर रेल्वे स्टेशन परिसरातून अपहरण केलेल्या अकरा महिन्याच्या बालकाचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. सदर बालक संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी परिसरात सापडले असून त्याला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी एकाला अटक केली आहे. याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, की रविवारी (दि. 23 जून) रात्री एक वाजेच्या सुमारास अहमदनगर रेल्वे पोलीस स्टेशन परिसरातून एका महिलेने स्वानंद आकाश खडसे (वय 11 महिने) या बालकाचे अपहरण केले होते.

याबाबत अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर बालक शहरामध्ये असल्याची माहिती नगरच्या पोलिसांना समजली. त्यानंतर अहमदनगर रेल्वे पोलीस उपनिरीक्षक एस. जी. लोणकर व त्यांचे सहकारी यांनी संगमनेर शहर पोलिसांना याची माहिती दिली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांचे दोन तपास पथक तयार करण्यात आले. पोलीस पथकाने रेल्वे पोलिसांना सोबत घेऊन समांतर तपास करत बालकास नवनाथ विष्णू धोत्रे (रा. अठरा पगड जाती, गुंजाळवाडी शिवार, ता. संगमनेर) याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. या बालकास त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले असून नवनाथ धोत्रे यास पुढील कारवाईसाठी अहमदनगर रेल्वे पोलीस सोबत घेऊन गेले आहेत.

सदरची कारवाई संगमनेर शहराचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक सोनल फडोळ, पोहेकॉ. गोविंद मोरे, राजू झोले, अशोक पारधी, पोना. पांडुरंग पटेकर, पोकॉ. अजित कुन्हे, शीतल बहिरट व अहमदनगर रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. जी. लोणकर, पोहेकॉ. बी. आर. गवळी, पोकॉ. पी. बी. गडाख, पोना. इरफान शेख, पोकॉ. देशमुख, अविनाश खरपास, आसाराम येवले, किरण तोरमल, मंगल आहेर, वनिता समिदर यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या