Friday, June 6, 2025
Homeनाशिकदुर्दैवी : पाण्याच्या बादलीत बुडून बालकाचा मृत्यू

दुर्दैवी : पाण्याच्या बादलीत बुडून बालकाचा मृत्यू

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

- Advertisement -

देवळालीगावमधील रोकडोबावाडी भागात एका दहा महिन्याच्या चिमुकल्याचा पाण्याच्या बादलीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रोकडोबावाडी देवळालीगाव येथे राहणारे अजय तायडे यांचा मुलगा रोशन हा रात्री साडेआठच्या सुमारास घरात खेळत असताना पाण्याने भरलेल्या बादलीत पडला. त्यावेळी त्याची घरात आई स्वयंपाक करत होती. रोशन घरातच असल्याचे गृहीत धरून कुणालाही काही शंका आली नाही. मात्र काही वेळाने रोशन कुठे दिसत नाही, हे लक्षात येताच घरात आणि आजूबाजूला शोध घेण्यात आला.

शोध घेत असताना तो घरातच ठेवलेल्या पाण्याच्या बादलीत बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याला तातडीने आजोबांनी बिटको रुग्णालयात नेले. परंतु वैद्यकीय अधिकारी डॉ. उगले यांनी त्याला मृत घोषित केले. ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

बँकेत तारण ठेवलेल्या फ्लॅटची परस्पर विक्री

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या सुमारे 291 कोटी रूपयांच्या कर्ज घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाला चार दिवसांची (9...