Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

नांदगाव | प्रतिनिधी Nandgaon

- Advertisement -

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात येथील एका सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. या प्रकाराने शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालिका प्रशासनाने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी संतप्त नागरीक करीत आहेत.

YouTube video player

गेल्या २२ डिसेंबररोजी शहरातील मोठी होळी चौकात खेळणार्‍या भावे दीपक भावसार या बालकाला भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला प्रारभी मालेगावी व त्याची प्रकृती गंभीर झाल्याने नाशिक येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. भटक्या कुत्र्यांच्या उच्छादामुळे एका निष्पाप बालकाचा जीव गेल्याने शहरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून शहरात भटया व मोकाट कुत्र्याचा प्रश्न गंभीर झाला असून लहान मुले, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दुचाकीस्वार व महिला हे मोकाट कुत्र्यांचा त्रासाने त्रस्त झाले आहेत. ही भटकी कुत्री धावत्या दुचाकीस्वाराचाही पाठलाग करतात. यामुळे अनेक अपघातही झाले आहेत. भटया कुत्र्याचा संख्येवर नियंत्रण आणण्याबरोबरच त्याचे निर्बिजीकरण करावे, अशी मागणी करूनही याबाबत प्रशासन फारसे गंभीर होत नसल्याबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करीत आहे.

ताज्या बातम्या

टॅरिफ

India-US Tariff: ग्रेट डील! अमेरिकन टॅरिफवरुन भारताला मोठा दिलासा; २५ टक्क्यांवरुन...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचे ‘अमेरिका फर्स्ट’ हे धोरण राबवण्यासाठी भारतावर तब्बल 25 टक्के टॅरिफ 1 ऑगस्ट 2025...