Monday, May 27, 2024
Homeनगरचिंभळे गोळीबार प्रकरणात फिर्यादीच निघाला आरोपी

चिंभळे गोळीबार प्रकरणात फिर्यादीच निघाला आरोपी

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

चिंभळे येथे जमिनीच्या वादातून झालेल्या गोळीबार प्रकरणात फिर्यादी सुनील गायकवाड (रा. चिंभळे, ता. श्रीगोंदा) हाच आरोपी निघाला असून बेलवंडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. जखमी संतोष उर्फ लाला गायकवाड यांच्या जबाबावरून बेलवंडी पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती समजली.

- Advertisement -

जयदीप सुरमकर याने जमिनीच्या वादातून गायकवाड यांच्यावर पिस्टलमधून सहा गोळ्या झाडल्याची घटना 10 ऑक्टोबरला घडली. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जयदीप सुरमकर व त्याचा साथीदार सचिन उर्फ चिंग्या भागवत याला बेलवंडी पोलीस अटक केली. या प्रकरणात फिर्यादी गायकवाड याचा सहभाग असण्याचा पोलिसांना संशय होता. त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू होता. नुकताच पोलिसांनी जखमी गायकवाड यांचा जबाब घेतला.

फिर्यादी सुनील गायकवाड, हल्लेखोर जयदीप सुरमकर व त्याचा साथीदार सचिन उर्फ चिंग्या सोपान भागवत या तिघांनी मिळून गोळीबार घडवून आणल्याचे जखमी गायकवाड यांनी त्या जबाबामध्ये म्हटले आहे. जखमी संतोष गायकवाड यांच्या जबाबावरून बेलवंडी पोलिसांनी फिर्यादी सुनील राजू गायकवाड याला अटक केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या