Saturday, May 18, 2024
Homeदेश विदेशचीनच्या कुरापती सुरुच; अक्साई चीनमध्ये उभारले बंकर्स, नवीन रस्ते, सॅटेलाईट छायाचित्रांमधून उघड

चीनच्या कुरापती सुरुच; अक्साई चीनमध्ये उभारले बंकर्स, नवीन रस्ते, सॅटेलाईट छायाचित्रांमधून उघड

नवी दिल्ली | New Delhi

चीन (China) पुन्हा एकदा भारताला (India) डिवचण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. याचं कारण चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेववर (LoC) स्थित अक्साई चीनमध्ये (Aksai Chin) भूमिगत बांधकामे (Underground Construction) केली आहेत. संघर्षाच्या काळात शस्त्रसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि हवाई हल्ल्यांपासून सुरक्षा मिळवण्यासाठी ही तयारी करण्यात आल्याचे सॅटेलाईटने काढलेल्या छायाचित्रांमधून दिसत आहे.

- Advertisement -

चीनने नुकताच आपल्या देशाचा नकाशा जाहीर केला होता. यात चीनने अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश देशाचा भाग असल्याचे दाखवले होते. चीनच्या मंत्रालयाकडून सोमवारी हा नकाशा जाहीर करण्यात आला होता. मॅक्सर या आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनीच्या सॅटेलाईट फोटोंमधून हा खुलासा झाला आहे. या फोटोंमध्ये नदीशेजारी असणाऱ्या टेकडीवर सैन्यांसाठी तटबंदी आणि शस्त्रे ठेवण्यासाठी बंकर उभे केल्याचे दिसत आहे.

झेंडा लावायला मंदिरावर चढले अन्…; तिघांचा करुण अंत, गावावर शोककळा

गलवानमध्ये भारतीय सैन्यांशी झडप झाल्यानंतर चीनने आक्रमक भूमिका घेतली असून हे बांधकाम त्यावरील प्रतिक्रिया असण्याची शक्यता असल्याचे आंतरराष्ट्रीय तज्ञांचे मत आहे. तसेच अक्साई चीनमधून भारतीय हवाई दलाची उपस्थिती कमी करण्याचा प्रयत्न असेल.

छायाचित्रांमधून अक्साई चीनच्या १५ चौ किमीच्या प्रदेशात सहा ठिकाणी बंकर आणि अंडरग्राऊंड सुविधा उभारण्यात आल्याचे दिसत आहे. हा भाग प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून ७० किलोमीटर अंतारावर आहे. याठिकाणी चीनकडून सैन्य तैनात करण्यात आले आहेत.

“सीमेच्या अगदी जवळ भूमिगत सुविधा उभारून आणि भूमिगत पायाभूत सुविधांचा विकास करून, चिनी रणनीतीकारांनी अक्साई चीनमध्ये भारतीय वायुसेनेचे वर्चस्व कमी करत संतुलन साधण्याचा प्रयत्न असावा,” असे इंटेल लॅबमधील एक प्रमुख उपग्रह प्रतिमा विशेषज्ञांनी म्हंटले आहे.

दरम्यान, भारतात पुढील महिन्यात जी-२० परिषद सुरु होणार असून, त्याआधीच चीनने आपले कुरापती करायला सुरुवात केली आहे. सोमवारी चीनने आपला अधिकृत नकाशा जाहीर करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. अरुणाचल प्रदेश तिबेटचा दक्षिण भाग असल्याचा चीनदा दावा आहे.तैवानला नकाशामध्ये स्थान देण्यात आला आहे. चीनचा अनेक भागावरुन इतर देशांची वाद आहे. नव्या नकाशामुळे हा वाद पुन्हा उफाळून आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या